Priyanka Chopra च्या मानेला झाली गंभीर दुखापत, हॉलिवूड चित्रपटाच्या शुट दरम्याव घडला अपघात

 


हिंदी सिनेमापासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. प्रियांकाच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. पण सध्या जी बातमी येत आहे ती तिच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री जखमी झाली आहे आणि तिच्या मानेला दुखापत झाली आहे. याचा एक फोटो ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा जखमी झाली आहे. हॉलिवूड चित्रपट ‘द ब्लफ’च्या चित्रीकरणादरम्यान प्रियांका चोप्राला ही दुखापत झाली आहे.(Priyanka Chopra injures)

Priyanka Chopra injures

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये या दुखापतीचा फोटो पोस्ट केला आहे. प्रियांका चोप्राची हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनाही तिची चिंता व्यक्त केली आहे. प्रियांका चोप्राने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर स्टोरीमधील एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की त्याच्या गळ्यावरील जखमेची लाल खूण स्पष्ट दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की. ‘आणि हा माझ्या प्रोफेशनल कामाचा मोठा धोका आहे.’ चित्रपटाच्या अॅक्शन सीक्वेंसदरम्यान स्टंट सीनच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्रीला ही दुखापत झाली होती. प्रियांकाची ही इन्स्टा स्टोरी पाहून तिच्या चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. मात्र, काही चाहते तिच्या समर्पणाचे कौतुक ही करत आहेत.

Priyanka Chopra injures

प्रियांका चोप्राने तिच्या दुखापतीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केला आणि सांगितले की, तिच्या मानेवर लांब कट आहे. मात्र, मानेवरील हा कट फारसा गंभीर आणि खोल दिसत नाही. पण ही जखम पाहिल्यानंतर प्रियांकाला त्यात खूप वेदना झाल्या असाव्यात असं वाटतं. प्रियांका चोप्रा तिचा पती आणि हॉलिवूड सुपरस्टार निक जोनससोबत परदेशात शिफ्ट झाल्यापासून ती हॉलिवूडप चित्रपटांमध्ये अधिक सक्रिय होऊ लागली आहे. प्रियांका सध्या तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट ‘द ब्लफ’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रियांका चोप्रा लवकरच हॉलिवूडचित्रपट हेड्स ऑफ स्टेटमध्ये झळकणार आहे. त्यासोबत जॉन सीना आणि इद्रीश इल्बा सारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच प्रियांका या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी फ्रान्समध्ये उपस्थित आहे.(Priyanka Chopra injures)

=================================

हे देखील वाचा: दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका दिक्षितची Big Boss Ott 3 मध्ये होणार एन्ट्री! प्रोमो ही झाला व्हायरल

=================================

प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात ‘द ब्लफ’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती कार्ल अर्बनसोबत ‘द ब्लफ’मध्ये काम करत आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे. ‘द ब्लफ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रँक ई. फ्लॉवर्स करत आहेत. ‘बॉब मार्ले : वन लव्ह’ या हिट चित्रपटाचे सहलेखन केल्यानंतर प्रियांका चोप्राने १२० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/priyanka-chopra-suffers-neck-injury-crashes-during-shoot-of-hollywood-film-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते