Big Boss OTT 3: शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी बिग बॅास निर्माते आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची केली मागणी

 


 Bollywood masalaबिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन जिओ सिनेमावर प्रसारित केला जातो. हा शो २४ तास लाइव्ह असतो आणि सध्या अरमान मलिक आणि कृतिका मलिक हे सर्वाधिक चर्चेत असलेले कपल आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी ‘बिग बॉस ओटीटी ३’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी 3 चे प्रसारण थांबवण्याची मागणी शिवसेना नेत्यानी केली आहे. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अश्लील कंटेंट प्रसारित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.( MLA Manisha Kayande on Big Boss)

MLA Manisha Kayande on Big Boss

शिवसेना नेत्यानी एक नोट जारी केली असून त्यात ‘बिग बॉस ओटीटी’वर बंदी घालण्याचे म्हटले आहे. मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली. मनीषा कायंदे म्हणाल्या की, 18 जुलै रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धक अरमान मलिक बिग बॉसच्या बेडरूममध्ये कृतिका मलिक सोबत इंटिमेट मोमेंट्समध्ये दाखवण्यात आला होता. ओटीटी शो बिग बॉस ३ वर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ”या शोमध्ये अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या आहेत”

MLA Manisha Kayande on Big Boss

माध्यमांशी बोलताना आमदार डॉ. मनीषा कायंदे अस ही म्हणाल्या आहेत की, ‘ अरमान मलिक आणि कृतिका या जोडप्याने मानवी नातेसंबंध आणि सामाजिक नियमांच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, लहान मुलेही हा कार्यक्रम पाहतात आणि त्याचा त्यांच्यावर परिणाम होतो.” तसेच याचा तरुणांच्या मनावर कसा परिणाम होतो? आम्ही केंद्रातील माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडेही जाणार असून संसदेच्या चालू अधिवेशनात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कायदा आणण्याची विनंती करणार आहोत. आम्ही त्यांना अभिनेते आणि मालिकेच्या सीईओंनाही अटक करण्यास सांगितले आहे.असं ही त्या म्हणाल्या.(MLA Manisha Kayande on Big Boss)

===============================

हे देखील वाचा: तो येतोय…आता कल्ला तर होणारच! ‘बिग बॉस मराठी’चा 5 वा सीझन 28 जुलैपासून सुरु होणार

================================

 Bollywood tadka अरमान मलिक आणि कृतिका मलिक हे पती-पत्नी असून ते ‘बिग बॉस ओटीटी ३‘मध्ये स्पर्धक म्हणून गेले होते. अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकही या शोमध्ये गेली होती पण तिला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. अरमान-कृतिकाचा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर पायलच्या अरमानसोबतच्या घटस्फोटाचा विषयही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/big-boss-ott-3-shiv-sena-leader-manisha-kayande-demands-action-against-bigg-boss-makers-and-contestants-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते