Big Boss Ott 3: ‘वडापाव गर्ल’ नंतर दीपक चौरसिया बिग बॉस ओटीटी ३ मधून बाहेर


 Bollywood masala अनिल कपूर होस्ट करत असलेला शो बिग बॉस ओटीटी 3 ला 21 जुलै ला तब्बल  एक महिना पूर्ण झाला आहे. हा शो २१ जूनपासून सुरू झाला होता. बिग बॉस ओटीटी 3 मधून एका महिन्यात 5 स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आले आहे आणि आता या आठवड्यात घरातून बेघर झालेला स्पर्धक बनले  आहे, पत्रकार दीपक चौरसिया. पत्रकार घरातून बेघर असताना घरातील स्पर्धक लवेकाश कटारियाच्या डोळ्यातून ही अश्रू अनावर झाले होते. या आठवड्याच्या एलिमिनेशन एपिसोडमध्ये बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव आणि  एल्विशसोबत फैजल शेख हे दोघे पाहुणे म्हणून आले होते. यावेळी या दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली होती.( Deepak Chaurasia Big Boss Ott)

Deepak Chaurasia Big Boss ott

बिग बॉस ओटीटी ३‘ मध्ये गेल्या ३० दिवसांत सहा स्पर्धकांना शोमधून बाहेर काढण्यात आले असून, त्यातील शेवटची स्पर्धक दिल्लीची ‘वडापाव गर्ल’ म्हणजेच चंद्रिका दीक्षित होती. तिच्या जाण्यानंतर आता बिग बॉस ओटीटी च्या घरातून ज्येष्ठ पत्रकार दीपक चौरसिया यांचा शो मधला प्रवासही संपला आहे. दीपक हे घरातील सर्वात मोठे होते आणि इतर लोक ही त्यांचा आदर करत होते मात्र असे जरी असेल तरीही अनेक स्पर्धकांची त्यांना नापसंती ही  होती. घरातून बाहेर पडताना दीपक चौरसिया यांनी घरातील स्पर्धक आणि अभिनेता रणवीर शौरीला सांगितले की, त्यांच्यात गोष्टी बदलणार नाहीत. शोमधून बाहेर पडल्यानंतर शिवानीच्या वडिलोपार्जित घरी जाण्याचे आश्वासनही दीपक यांनी दिले. दीपक चौरसियाने शो सोडल्यानंतर सर्वात जास्त धक्का आणि वाईट रणवीर शौरीला वाटले.  

ते घरातून बाहेर पडल्यानंतर रणवीर बराच वेळ एकटे बसले होतेते पाहुन नंतरविशाल, नेझी आणि लवकेश यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. दीपक चौरसिया यांच्यासह या आठवड्यात लवकेश कटारिया, विशाल पांडे, सना सुलतान, अदनान शेखसना मकबूल आणि अरमान मलिक यांच्या डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार लटकत होती. दीपकच्या आधी दिल्लीची वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितला शोमधून बेघर करण्यात आले होते.(Deepak Chaurasia Big Boss Ott)

=============================

हे देखील वाचा: ‘फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा’ शिव ठाकरेने व्यक्त केली खंत…

==============================

 Bollywood tadka दीपक यांनी बिग बॉस च्या घरात असताना घरातील स्पर्धकांना आपला करिअर चा प्रवास आणि त्यात पत्रकार असताना घडलेल्या काही गोष्टीही सांगितल्या होत्या , पण अनिल कपूरच्या या रिअॅलिटी शोमध्ये सेन्सॉर असल्याने बऱ्याचदा त्या गोष्टी पूर्ण दाखवता आल्या नाहीत. 

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/deepak-chaurasia-evicted-from-bigg-boss-ott-3-after-vada-pav-girl-info/

 






Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते