‘फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा’ शिव ठाकरेने व्यक्त केली खंत…

 


प्लॅनेट मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन विषय, आशय घेऊन येते. आपली हीच परंपरा कायम ठेवत प्लॅनेट मराठी असाच उत्सुकता वाढवणारा ‘आयुष्याची जय’ हा एक नवा पॉडकास्ट शो घेऊन आला आहे. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींसोबत यात भरपूर गप्पा मारल्या जाणार आहेत. अनेकांना आपल्या लाडक्या कलाकारांबद्दलचे माहित नसलेले अनेक किस्से यावेळी शेअर केले जातील आणि या कलाकारांसोबत गप्पा मारणार आहे, सर्वांची लाडकी सूत्रसंचालिका जयंती वाघधरे. या शोच्या पहिल्याच भागात बिग बॉस मराठी सिझन २ चा विजेता शिव ठाकरे सहभागी होणार असून यावेळी त्याने अनेक त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.(Big Boss Winner Shiv Thakare)


या पॉडकास्ट चा एक प्रोमो सध्या समोर आला आहे. आणि अवघ्या काही वेळात तो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना ही पहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये शिव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे आदर, प्रेम, व्यक्त करताना दिसत आहे. त्याचे गडांप्रती असलेले प्रेमही या प्रोमो मधून दिसत आहे. त्यामुळे या शोमधून शिव किती महाराजभक्त आहे आणि त्यांच्या बद्दल तो काय विचार करतो याचे दर्शन घडतेय. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात. त्यामुळे महाराजांचे फक्त नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा, अशी विनंतीही शिवने यावेळी केली आहे. याव्यतिरिक्त शिवच्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्याने या पॉडकास्टमधून उलगडल्या आहेत.(Big Boss Winner Shiv Thakare)

====================================

हे देखील वाचा: तब्बल दोन वर्षानंतर अभिनेता विशाल निकमने केसाला लावली कात्री

====================================

या शोबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात की, “कलाकारांच्या आयुष्यातील अनुभव, वैचारिक मत, त्यांच्यासाठी असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना ‘आयुष्याची जय’ या शोच्या माध्यमातून समजणार आहेत. या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला असून पुढे या शोमध्ये रॅपर सृष्टी तावडे, स्मिता तांबे, श्रेया बुगडे, युट्यूबर विनायक माळी आदी सेलिब्रिटीजही सहभागी होणार आहेत.”


Original content is posted on: https://kalakrutimedia.com/shiv-thackeray-expresses-regret-in-aayushyachi-jai-podcast-on-planet-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

'Zimma 2' re-opens old relationship

The presence of the Vice President at the premiere of Guru Dutt's film

This is an important reminder of 'Qayamat'