Big Boss Marathi 5: भावनांच्या या खेळात सगळे झाले भावशून्य, ‘बिग बॉस’ कोणती अॅक्शन घेणार?

 



बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सध्या सुरू आहे. ‘बिग बॉस’ म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. ‘बिग बॉस मराठी‘च्या कालच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. बाहुल्यांना पाहून घरातील सर्व सदस्य आनंदीत झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता. एका बाहुल्याला निक्कीने घेतले, तर एका बाहुल्याला जान्हवीने घेतले. त्यानंतर निक्की पुढे घन:श्यामला विचारते,”तू मामा आहेस ना”. घन:श्यामही निक्कीला उत्तर देत “हो..मी मामा आहे”, असं म्हणतो. त्यावर निक्की पुढे म्हणते,”बाळ माझ्यासारखं आहे”. त्यानंतर निक्कीला ‘बिग बॉस’ म्हणतात,“निक्की.. डायरेक्ट बाईSSS वरुन डायरेक्ट आईSSS”. त्यानंतर घरात एकच हशा पिकतो.( Big Boss Marathi 5) Bolllywood masala.

Big Boss Marathi 5

या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचं दु:खंदेखील दिलंय. घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले. पण आजच्या भागात भावनांच्या या खेळात सदस्य भावशून्य झालेले दिसून येणार आहेत. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ काय अॅक्शन घेणार हे पाहावे लागेल.

Big Boss Marathi 5

चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य त्यांच्यासोबत जोडले गेले. सदस्य या पाहुण्यांसोबत वेळ घालवताना दिसून आले. तर काहींनी या पाहुण्यांवरुन भांडणेदेखील केली. पण पाहुण्यांनी मात्र घरातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला.(Big Boss Marathi 5)

===============================

हे देखील वाचा: ‘Big Boss Marathi’च्या घरात जान्हवी आणि आर्या एकमेकींना भिडल्या; भांडणानंतर दोघींमध्ये हाणामारी

===============================

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”हा खेळ मानवी भावनांचा आहे. दोन्ही टीम भावनाशून्य होऊन खेळलात. त्यामुळे मीदेखील आता भावनाशून्य होऊन…”. घरातील सदस्य भावनाशून्य खेळल्याने बिग बॉस सदस्यांना काय शिक्षा देणार हे पाहावे लागेल.  ‘BIGG BOSS मराठी’ आपल्याला रोज रात्री 9 वा. कलर्स मराठीवर आणि विनामूल्य officialjiocinema वर पाहता येईल. Bollywood masala.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/big-boss-marathi-5-what-action-will-bigg-boss-take-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते