अभिनेत्री अमृता खानविलकर करणार ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’मधून भव्य नाट्यपदार्पण

 


अमृतकला स्टुडिओ आणि ‘अर्थ‘ एनजीओ प्रस्तुत ‘वर्ल्ड ऑफ स्त्री‘ हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच एक अनोखा नृत्य नजराणा अमृता खानविलकर ‘वर्ल्ड ऑफ स्त्री‘ च्या माध्यमातून घेऊन येत आहे.(Actress Amruta Khanvilkar) Bollywood tadka.

Actress Amruta Khanvilkar

या निमित्ताने तिचे थेट प्रेक्षकांसमोर नृत्यप्रयोग सादर करण्याचे स्वप्न साकार होत आहे. या नृत्यप्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना क्लासिकल, सेमी क्लासिकल म्युझिक आणि नृत्याची अनोखी मैफल अनुभवयाला मिळणार आहे. या कलाकृतीत स्त्रीशक्ती, महिला सक्षमीकरण, शृंगार, भक्ती यांचे दर्शन घडणार आहे.  यात तिच्यासोबत नृत्यदिग्दर्शक कुशल नर्तक आशिष पाटील देखील सहभागी होणार आहेत. या नृत्याविष्काराची मैफल  ९० मिनिटांची असून पुढील येणाऱ्या काळात विविध नाट्यगृहात हा प्रयोग होणार आहे.(Actress Amruta Khanvilkar)

===============================

हे देखील वाचा: अभिनेत्री तेजस्विनी पंडित ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार

===============================

येत्या २४ ऑगस्टला ‘वर्ल्ड ऑफ स्त्री‘ चा पहिला प्रयोग टाटा थिएटर, एनसीपीएमध्ये सादर होणार आहे. अमृता खानविलकर एक अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेच पण तिच्या नृत्याविष्काराची एक विशिष्ट बाजू प्रेक्षकांना या निमित्ताने जवळून अनुभवायला मिळणार आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्त्री‘ या नृत्याविष्काराबद्दल अमृता खानविलकर सांगते, “नृत्यकला हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ च्या आविष्कारामुळे नृत्य, संगीत, नाट्य या तिन्ही कलांची सांगड घालून एक अनोखी कलाकृती रसिकांसमोर येतेय, याचा मला अत्याधिक आनंद होतोय. नृत्य हे भावना व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे मला यातून व्यक्त व्हायला नेहमीच आवडते.  त्यामुळे अशा या भावपूर्ण मैफलीत रसिकांचे मनोरंजन करण्यात मला कुशल नर्तक आशिष पाटील यांची साथ लाभणार आहे.” Bollywood tadka


Original content is posted on: https://kalakrutimedia.com/actress-amruta-khanvilkar-to-make-her-dramatic-debut-with-world-of-stree-info/




Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते