आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी दाखवणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ २० डिसेंबरला येणार भेटीला

 




शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. आजच्या काळातील ‘हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हा जोडी सिनेमात एकत्र येणार आहे.(Hashtag Tadev Lagnam Marathi Movie Bollywood masala.

Hashtag Tadev Lagnam Marathi Movie

 नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लग्नाच्या वेषात घोड्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरदेव दिसत आपल्याला आहे तर त्याच्यामागे ऑफिसच्या पेहरावात बसलेली नवरी ही दिसत आहे. त्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे, असा प्रश्न पोस्टर पाहून प्रथमदर्शनी सगळ्याच्याच डोक्यात येतोय. यात लग्नकार्यातील धमाल तर आहेच. पण याशिवाय आजच्या काळातील लग्न, पिढीचे विचारही आपल्याला दिसणार आहेत तसेच दोघांच्या प्रवासाची पार्श्वभूमी ही वेगळी असल्याने चित्रपटाची कथा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, असे म्हणायला हरकत नाही. (Hashtag Tadev Lagnam Marathi Movie)

===============================

हे देखील वाचा: ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा झाला शुभारंभ; संपूर्ण स्टारकास्ट ही आली समोर

================================

चित्रपटाबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले या सिनेमाबद्द्ल म्हणतात की, “आयुष्याच्या वाटेवर लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. आत्ताची पिढी लग्न हा विषय आणि नातेसंबंधांवर काय भाष्य करते, यावर आधारित असणारा हा चित्रपट सर्वांनाच आपलासा वाटेल, असा आहे. त्यामुळे या चित्रपटातील वेगळेपणा बघण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.” शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि यामध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडी एकत्र दिसत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. Bollywood masala.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/the-hashtag-tadeva-lagnam-which-showcases-the-different-love-story-of-a-husband-and-a-bride-will-hit-the-screens-on-december-20-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते