Skip to main content

‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ ही मालिका सोनी मराठीवर पून्हा अनुभवता येणार

 




आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत सतत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं खुप महत्वाचे आणि गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची‘ सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत असतात, गुन्ह्यांची चाहूल ही आधीच लागेलेली असते पण आपण ती नजरअंदाज करतो. या मालिकेतून प्रेक्षकांच गुन्हेगारी विश्वापासून कसं सावध राहता येईल यावर प्रबोधन होणार आहे; आणि म्हणूनच गुन्हेगारी विश्वातील रंजक केसेस सोनी मराठी वाहिनी पुन्हा दाखवणार आहे. क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची मालिकेतून प्रेक्षकांनी सावध राहणं का गरजेचं आहे हे समजण्यासाठी मालिकेचे पुनः प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनी करत आहे. (Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial) bollywood tadka

Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial

अभिनेता अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. अभिजित खांडकेकर हा एक उत्तम सूत्रसंचालक असून आजवर त्याच्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याची उत्तम संवाद फेक आणि भाषेवरची पकड यामुळे तो प्रेक्षकांना अजून आपलासा वाटतो. क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा या याबद्दल बरीच माहिती मिळणार आहे.(Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial)

============================

हे देखील वाचा: सुरू होते आहे ‘नवनाथांचे महापर्व’…; ‘गाथा नवनाथांची’ मालिका पाहा आता नव्या वेळेत

============================

या मालिकेत अभिजित खांडकेकर एका जबाबदार निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे जो मनोरंजनाच्या माध्यमातून सतर्कतेचा संदेश देखील देणार आहे. क्राईम शोज ना प्रेक्षकांची नेहमीच विशेष पसंती असते. या आधी देखील बऱ्याच क्राईम शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सर्वसामान्यांच्या कल्‍पनाशक्‍तीला आव्‍हान देणाऱ्या, प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आणि अशक्‍य वाटणाऱ्या गुन्‍ह्यांच्‍या कथा मालिकांमधून पाहायला मिळतात. आणि अशाच धाटणीचा कार्यक्रम आता मराठीत सोनी मराठी वाहिनी पुन्हा घेऊन आली आहे. ही मालिका प्रेक्षकांनागुरुवार आणि शुक्रवार रात्री ९.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहाता येईल. Bollywood tadka

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/interesting-tales-from-the-world-of-crime-will-unfold-on-the-small-screen-sony-marathis-new-show-criminals-chahul-gunhegaranchi-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते