दशकातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर…


 

जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून…  “काही  ‘रानटी’  असतात, काही बनतात! प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने भरलेला आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे ‘सरप्राईज’ असणार आहे.( Raanti Marathi Movie) Bollywood masala

Raanti Marathi Movie

शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे ह्या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की,’अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’  चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे.

Raanti Marathi Movie

चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडलीये. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Raanti Marathi Movie)

================================

हे देखील वाचा: ‘येक नंबर’ सिनेमाच्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष …

================================

ह्या सिनेमासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.चित्रपटाचं पोस्टर आणि चित्रपटाचं नाव यावरून ‘रानटी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करून पैसा वसुल करणार हे नक्की.  २२ नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.  Bolllywood masala.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/the-biggest-action-film-of-the-decade-raanti-is-on-the-marathi-silver-screen-info/

Comments

Popular posts from this blog

'Zimma 2' re-opens old relationship

The presence of the Vice President at the premiere of Guru Dutt's film

This is an important reminder of 'Qayamat'