अभिनेता जयदीप कोडोलीकरचे ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण

 




आत्ताच्या तरुण पिढीकडे प्रचंड टॅलेन्ट आहे. भन्नाट कल्पना आहेत. याच जोरावर अनेक नवे चेहरे काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. सर्जनशाळा‘ आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर येथील कलेला पोषक असं वातावरण..त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा जयदीप आता आता लवकरच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि संदीप सावंत दिग्दर्शित आगामी ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटात मुकुंदच्या मध्यवर्ती  भूमिकेत त्याची महत्त्वपूर्ण  भूमिका आहे.(Actor Jaydeep Kodolikar) Bollywood masala.

Actor Jaydeep Kodolikar

विशेष म्हणजे या चित्रपटासाठी ‘२० व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये इंडियन कॉम्पिटिशन विभागात’ जयदीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळला आहे. ८ नोव्हेंबरला  हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून भावभावनांचे कंगोरे उलगडणाऱ्या टिझरमधून मुकुंदच्या भावविश्वाची झलक पहायला मिळते आहे. जयदीप सोबत प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

Actor Jaydeep Kodolikar

इचलकरंजी तसेच तिथल्या डीकेटीई सोसायटीच्या टेक्सटाईल आणि अभियांत्रिकी संस्थेत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. इचलकरंजी, जयसिंगपूर ,सांगली आणि गणेशवाडीचे विशेष  सहकार्य या चित्रपटासाठी लाभले आहे.नात्यांचा ऋणानुबंध जपत जगणं शिकवणारा हा चित्रपट माझ्यासाठी  खूप म्हत्त्वाचा असल्याचं  जयदीप  सांगतो.  डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या ‘मृत्यूस्पर्श’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट  सर्वांना लढण्याचं बळ निश्चितचं  देईल.(Actor Jaydeep Kodolikar)

===============================

हे देखील वाचा: दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच येणार भेटीला…

===============================

पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. आणि संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. ८ नोव्हेंबरला ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. Bollywood tadka.

Orginal content is posted on: https://kalakrutimedia.com/actor-jaydeep-kodolikar-made-his-debut-in-the-film-industry-with-hya-goshtila-naavach-nahi-movie-info/




Comments

Popular posts from this blog

The presence of the Vice President at the premiere of Guru Dutt's film

This is an important reminder of 'Qayamat'

'Zimma 2' re-opens old relationship