रिंकू राजगुरू दिसणार नव्या रूपात, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न…

 


मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता लवकरच आणखीक एक नव्या विषयाचा नवा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होत आहे.आणि नुकताय या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू ही प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.(Rinku Rajguru Jijai Movie)

Rinku Rajguru Jijai Movie

त्या बरोबरच अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात आपल्याला दिसणार आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून देशभरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने नंतरही काही दमदार भूमिका साकारल्या आहेत.ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Rinku Rajguru Jijai Movie

झिम्मा 2’मधील तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं. त्यानंतर रिंकू कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती.आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.(Rinku Rajguru Jijai Movie)

=================================

हे देखील वाचा: ‘जिलबी’१७ जानेवारीला भेटीला;प्रसाद ओक स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे पहिल्यांदाच एकत्र!

=================================

झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’ bollywood tadka

Original content is postedb on: https://kalakrutimedia.com/rinku-rajguru-will-be-seen-in-a-new-avatar-the-muhurat-ceremony-of-the-film-jijai-has-been-completed-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते