Avdhoot Gupte गायक अवधूत गुप्तेने भावाचे कौतुक करत शेअर केली खास पोस्ट

 


मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय संगीतकार, गायक, दिग्दर्शक म्हणजे अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte). अवधूतने त्याच्या जबरदस्त गाण्यांनी आणि हटके चित्रपटांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. अवधूत जसा त्याच्या गाण्यांसाठी आणि चित्रपटांसाठी ओळखला जातो तसा तो त्याच्या खुमासदार सूत्रसंचालनासाठी देखील प्रसिद्ध आहे. अवधूत चर्चेत येण्याचे अजून एक कारण म्हणजे त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट. (Marathi News)

अवधूत सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असून, तो सतत विविध पोस्ट शेअर करत असतो. या पोस्टच्या माध्यमातून तो नेहमी त्याच्या आयुष्यातील आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची माहिती फॅन्सला देत असतो. आता देखील अवधूत पुन्हा एकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच चर्चेत आला आहे. या पोस्टमधून अवधूतने त्याच्या भावाबद्दल सगळ्यांना सांगत भावाचे कौतुक केले आहे. अवधूतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय लिहिले जाणून घेऊया. (Avdhoot Gupte)

“हा माझा सख्खा आणि एकुलता एक चुलत भाऊ डॉ. अक्षय गुप्ते. हो! हो! तुमचं बरोबर आहे. उजवीकडून तो टायगर श्रॉफ सारखा.. पण थोडा जास्त आणि डावीकडून हृतिक रौशन सारखा.. पण खूप जास्त हॅंडसम दिसतो! दुर्दैवाने मी निर्माता-दिग्दर्शक होण्याआधीच तो MBBS पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेला.. नाही तर ‘झेंडा‘ मधल्या सिद्धार्थच्या जागी किंवा ‘भटिंडा‘ मधल्या अभिजीत च्या जागी हाच दिसला असता! (सिद्धू-अभी.. चिडायचं नै हं!)

View this post on Instagram

A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)

पण, कदाचित आई एकविरेनेच त्याच्यासाठी खूप वेगळी आणि खूप मोठी योजना ठरवली होती. म्हणूनच..
जवळपास एका तपाच्या तपस्येनंतर अमेरिकेतुनच शल्यचिकित्सेचा अभ्यास करून आणि संशोधन करून तो पारंगत न्यूरोसर्जन #neurosurgeon म्हणून टेक्सास मधील “एल पासो” ह्या शहरात स्थायिक झाला. मग, काही वर्षांनी भारतात परत येऊन आपल्या लहानपणीच्या प्रेमाशी, म्हणजेच ‘रुमा‘ नावाच्या मराठी मुलीशी लग्न करून तिला घेऊन परत अमेरिकेला गेला.

त्याला दोन गोड मुली देखील झाल्या आणि तेथील वास्तव्याच्या काळामध्ये अनेक भारतीयांप्रमाणेच तो “कधी ना कधीतरी आम्हाला भारतात परत यायचंच आहे” असं म्हणत राहीला. परंतु, एवढ्या मोठ्या सर्जनला मिळणारा एवढा मोठा पैसा, मान मरातब आणि अमेरिकेतील सुख सोयी पाहता तो परत येईल असं आम्हा कुटुंबीयांना कधीच वाटलं नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर, त्याने परत यावं अशी मनापासून आमची देखील फार इच्छा नव्हती.

परंतु, मागील वर्षी त्याने ठरवल्याप्रमाणे तो खरोखरच भारतात परत आला.. ते म्हणजे केवळ आपल्या मातृभूमीवरील, मातृभाषेवरील, महाराष्ट्रावरील आणि विशेषतः पुण्यावरील प्रेमामुळे. निर्णय फारच मोठा आणि जोखिमेचा होता! परंतु, आज मात्र त्याची स्वप्नपूर्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आई एकविरेच्या आशीर्वादाने त्याने “एकविरा न्युरो” नावाने स्वतःची कन्सल्टिंग फर्म कोथरूड मधील सिटी प्राईड थेटर च्या समोरील नवीन उभ्या राहिलेल्या GKK संकुलामध्ये चालू केली आहे.

=================================

हे देखील वाचा: Fussclass Dabhade Trailer: आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला!

=================================

खरंतर तुमच्यापैकी कुणावरच त्याच्याकडे मदतीसाठी जायची वेळ न येवो! परंतु, दुर्दैवाने तुमच्या आजूबाजूच्या, ओळखीच्या कुणावर जर मेंदू किंवा मणक्याच्या सर्जरीची वेळ आलीच .. तर केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट न्यूरोसर्जनस्च्या फळी मधील एक सर्जन, हा आपला हक्काचा मराठी मुलगा आहे आणि आता तो आपल्या पुण्यामध्ये आहे हे विसरू नका! बाकी.. आई एकविरेचे आणि तुमचे आशीर्वाद हे जसे माझ्या पाठीशी कायम असतात, तसेच ते अक्षयाचाही पाठीशी कायम असतील.. ह्याची मला खात्री आहे! धन्यवाद!!”

अवधूतच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच अक्षयचे कौतुक देखील केले आहे. Bollywood masala 

Original content is posted on : https://kalakrutimedia.com/singer-avdhoot-gupte-share-special-post-for-his-brother-marathi-info/




Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते