Vijay Sethupathi टेलीफोन बूथ ऑपरेटर ते पॅन इंडिया स्टार जाणून घ्या विजय सेतुपतीचा अभिनय प्रवास


दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी पॅन इंडिया ओळख मिळवली. अशाच एक साऊथ सुपरस्टार अभिनेता म्हणजे विजय सेतुपती (Vijay Sethupathi)आपल्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाने विजयने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि त्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. आज विजय त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. (Vijay Sethupathi)

विजय सेतुपती चा जन्म १६ जानेवारी १९७८ रोजी तामिळनाडूच्या राजापालयम येथे झाला. विजयने त्याचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये व्यतीत केले. तो सहावीत असतांना त्याचे संपूर्ण कुटुंब चेन्नईला आले. विजयने घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी अनेक कामं केली. (Vijay Sethupathi Birthday)

विजय सेतुपतीने धनराज बेद महाविद्यालयातून वाणिज्य विभागात पदवी पूर्ण केली. पदवी घेतल्यानंतर विजयने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी सुरू केली. त्यानंतर एका फास्ट फूडच्या दुकानात कॅशिअरची नोकरीही केली. तसेच विजय सेतूपतीनं फोन बुधवर ऑपरेटर म्हणून देखील काम केले. मात्र जास्त पैसे कमवण्यासाठी त्याने थेट दुबई गाठले. (Ankahi Baatein)

Vijay Sethupathi

दुबईमध्ये त्याने काही काळ जॉब केला. त्याला तिकडे चांगला पैसा मिळत होता. मात्र असे असूनही त्याचे मन रमत नव्हते. पुढे तो दुबई सोडून पुन्हा भारतात परत आला. चेन्नईमध्ये त्याने एका थियेटर ग्रुप जॉइन केला आणि तिथे सहाय्यक अकाऊंटंट म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्याला काही छोट्या छोट्या भूमिका करण्याची संधी मिळायला लागली. (Entertainment mix masala)

पुढे विजयने टीव्ही मालिकांमध्ये कामं करण्यास सुरुवात केली. हळूहळू तो अभिनयात रमत होता. अशातच त्याच्याकडे एक सुवर्ण संधी चालून आली. रामासामीच्या ‘तेन्मेरकु परुवकात्रु’या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी विजयला विचारणा झाली. विजयने देखील होकार दिला. सिनेमा तुफान गाजला. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यानंतर मात्र विजयने कधीच मागे वळून पाहिले नाही. (Bollywood Masala)

चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी विजयाकडे ना रूप होते, ना रंग, ना चांगली बॉडी. तरीही आज तो केवळ स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. विजयला अनेकदा त्याच्या दिसण्यावरून लोकांनी ट्रोल देखील केले. तो बॉडी शेमिंगचा देखील शिकार झाला. मात्र त्याच्यासाठी या गोष्टी कधीच महत्वाच्या नव्हता. विजयने त्याच्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजनविश्वात कोणत्याही पाठिंब्याशिवाय आपले स्थान निर्माण केले आहे.

Vijay Sethupathi

मुख्य भूमिका, ऍक्शन, ड्रामा, रोमॅंटिक, व्हिलन आदी सर्वच प्रकारच्या भूमिकांमधून कामं करत त्याने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. शाहरुख खानच्या ‘जवान’ या सिनेमात त्याने साकारलेल्या व्हिलन आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. विजयने स्वतः ला केवळ यशस्वी अभिनेता नाही तर एक निर्माता, संवाद लेखक, गीतकार म्हणून देखील सिद्ध केले आहे. त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस असून तो त्याच्या अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती करतो.

===============

हे देखील वाचा : Sidharth Malhotra मॉडेलिंग, सहाय्यक दिग्दर्शक ते बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा अभिनय प्रवास

===============

विजयला त्याच्या अभिनयासाठी अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सुरुवातीला थोड्या थोड्या पैशासाठी अनेक नोकऱ्या करणारा विजय आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. एका माहितीनुसार त्याची १५० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असून तो अनेक आलिशान गाड्यांचा मालक आहे. दरम्यान २००३ मध्ये विजय सेतूपतीने जेस्सीसोबत लग्नगाठ बांधली. त्या दोघांना श्रीजा आणि सूर्या ही दोन मुलं आहेत.

Original content is posted on : https://kalakrutimedia.com/happy-birthday-vijay-sethupathi-know-the-actors-struggle-story-marathi-info/


 

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते