Zee marathi : ‘जाऊ बाई गावात’च्या तुफान यशानंतर येतंय ‘चल भावा सिटीत’!
‘ झी मराठी ‘ (Zee marathi) वर नुकताच एक टिझर रिलीझ झाला, “ आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय “! त्यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे, ती म्हणजे हा कार्यक्रम नक्की काय आहे, रिऍलिटी शो आहे की नवी मालिका आहे याची! अखेर यांचा उलगडा झाला आहे. ‘ चल भावा सिटीत ‘ हा एक असा शो असणार आहे, जो कदाचित मराठी टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोची परिभाषाच बदलून टाकेल! गेल्याच वर्षी ‘झी मराठी’वर (Zee marathi) ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम येऊन गेला. हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. ‘ रमशा फारुखी ‘ या शोची विजेती ठरली. आता याच पार्श्वभूमीवर, काहीतरी वेगळं घेऊन लवकरच ‘चल भावा सिटीत’ हा नवाकोरा शो सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धक एकत्र येणार आहेत. या स्पर्धकांना अश्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास तो खेळ प्रवृत्त करेल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि त्यांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना महाराष्ट्राची ...