Zee marathi : ‘जाऊ बाई गावात’च्या तुफान यशानंतर येतंय ‘चल भावा सिटीत’!

 



झी मराठी‘ (Zee marathi) वर नुकताच एक टिझर रिलीझ झाला, “आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय“! त्यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे, ती म्हणजे हा कार्यक्रम नक्की काय आहे, रिऍलिटी शो आहे की नवी मालिका आहे याची! अखेर यांचा उलगडा झाला आहे. ‘चल भावा सिटीत‘ हा एक असा शो असणार आहे, जो कदाचित मराठी टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोची परिभाषाच बदलून टाकेल!

गेल्याच वर्षी ‘झी मराठी’वर (Zee marathi) ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम येऊन गेला. हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. ‘रमशा फारुखी‘ या शोची विजेती ठरली. आता याच पार्श्वभूमीवर, काहीतरी वेगळं घेऊन लवकरच ‘चल भावा सिटीत’ हा नवाकोरा शो सुरू होणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धक एकत्र येणार आहेत. या स्पर्धकांना अश्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास तो खेळ प्रवृत्त करेल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि त्यांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना महाराष्ट्राची ग्रामीण समृद्धी व संस्कृती दाखवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार याचा उलगडा हळूहळू जाईलच!

==============

हे देखील वाचा : Chhaava review : कसा आहे विकी कौशलचा ‘छावा’?

==============

या शोचा प्रोमो तर गाजतोच आहे, परंतु या नव्याकोऱ्या शोचा सूत्रधार कोण असणार ह्याची सुद्धा उत्सुकता वाढताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये “मी येतोय, लवकरच” अशी वाक्य दिसत आहेत. ‘जाऊ बाई गावात’चं सुत्रसंचलन अभिनेता ‘हार्दिक जोशी‘ याने केलं होतं. त्यामुळे आता यावेळी कोणता अभिनेता दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा ‘चल भावा सिटीत’ लवकरच ‘झी मराठी’वर (Zee marathi) पाहायला मिळणार आहे. Bollywood masala

Original content is posted on : https://kalakrutimedia.com/zee-marathi-after-the-huge-success-of-jaau-bai-gavat-chal-bhava-city-is-coming/




Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते