Rajkumar Rao ने पत्नी Patralekha सोबत संगमात पवित्र स्नान करत साध्वी सरस्वतीसोबत केली विशेष पूजा !

 


Rajkumar Rao: महाकुंभात डुबकी मारण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक नामवंत सेलिब्रिटी आधीच दाखल झाले आहेत. यात हेमा मालिनी, अनुपम खेर, भाग्यश्री, मिलिंद सोमण, कुमार विश्वास, कोरिओग्राफर रेमो डिसूझा, ममता कुलकर्णी, संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा समावेश आहे. आता या यादीत अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांचीही भर पडली आहे. या जोडप्याने नुकतेच प्रयागराज गाठले आणि त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे.(Rajkumar Rao in Maha Kumbh)

Rajkumar Rao in Maha Kumbh

राजकुमार रावने एएनआयला बोलताना सांगितले की, ‘मी संगमात डुबकी मारण्यासाठी खूप उत्सुक आहे. आम्ही या आधीही इथे आलो आहोत. माझं आणि माझ्या बायकोचं गंगा मातेवर खूप प्रेम आहे.’ आपल्या निवासस्थानाविषयी अधिक चर्चा करताना राजकुमार म्हणाला की , ‘आम्ही परमार्थ निकेतन आश्रमात स्वामीजींसोबत मुक्काम करत आहोत आणि आम्ही स्नान करून खुप आनंदी आहोत. ‘

Rajkumar Rao in Maha Kumbh

राजकुमार रावनेही आपला अनुभव शेअर केला आहे. तो म्हणाले, ‘इथलं वातावरण खूप चांगलं आहे. मागच्या वेळी मी माझ्या पत्नीसोबत कुंभमेळ्यात गेलो होतो, त्या अनुभवाने माझं आयुष्यच बदलून टाकलं. आम्ही स्वामीजींना ऋषिकेशमध्ये भेटलो आणि तेव्हापासून त्यांना भेटत आहोत.’ तो पुढे असं ही म्हणाला की , ‘आम्हाला स्वामीजींचा आशीर्वाद मिळाला आणि आम्ही पवित्र स्नान ही केले आहे. हे इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केले जाते. सर्व जनता आणि प्रशासनाच्या पाठीशी माझ्या शुभेच्छा आहेत.’ परमार्थ निकेतनने इन्स्टाग्रामवर राजकुमार राव आणि त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.(Rajkumar Rao in Maha Kumbh)

=============================

हे देखील वाचा: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता Vicky kaushal!

=============================

काही दिवसांपूर्वी राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांनी स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव ‘काम्पा फिल्म’ असं ठेवलं आहे. त्यांनी एक चिठ्ठी शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे की, ‘तुम्हाला जे आवडते ते सुंदरपणे करा – रूमी. ‘‘काम्पा फिल्म’ ‘ सादर करीत आहे. आईच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात काहीही चांगलं घडत नाही. ‘काम्पा’ हे नाव आपल्या आईच्या नावांचे मिश्रण आहे. लवकरच आमच्या पहिल्या फीचर चित्रपटाची घोषणा केली जाईल. ‘काम्पा फिल्म’ .’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा ‘टोस्टर’ हा त्यांचा पहिला प्रॉडक्शन व्हेंचर आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. Bollywood tadka

Original content is posted on : https://kalakrutimedia.com/rajkumar-rao-along-with-his-wife-patralekha-performed-a-special-puja-with-sadhvi-saraswati-by-taking-a-holy-bath-in-the-mahakumbh-sangam-info/



Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते