Sikandar : सलमानच्या सिकंदरने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बक्कळ कमाई!

 



    सलमान खान आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ‘सिकंदर’ (Sikandar चित्रपट ईदच्या निमित्ताने देशभरात प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच काळापासून प्रेक्षक सलमानच्या या चित्रपटाची वाट पाहात आहेत. त्यातच रश्मिका आणि त्याची केमिस्ट्री पाहण्याची देखणी उत्सुकता दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र, सलमानने यंदा रिस्क घेत चित्रपट रविवारी प्रदर्शित करण्याचा घेतलेला निर्णय बॉक्स ऑफिसवर कमाई करुन देईल का? असा प्रश्न उपस्थित करतो. पण, ‘सिकंदर’ने अॅव्हान्स बुकिंगमध्येच धुमाकूळ घातला आहे. (Sikandar movie advance booking)

    विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाची सलमान खानच्या (Salman Khan) ‘सिकंदर’सोबत (Sikandar) टक्कर होणार आहे. १४ फेू्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला छावा अजूनही थिएटरमध्ये आपली जागा कायम ठेवून आहे. आता सिकंदर चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे छावाचा क्रेझ कमी होण्याची शक्यता असून अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले आहेत. (Bollywood update) Bollywood Tadka

    ‘सिकंदर’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून सॅकनिल्कच्या अहवालानुसार, बुधवार २६ मार्चच्या सकाळपर्यंत या चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी २.५ कोटी रुपये (नेट) ची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे, जी २.९५ कोटी रुपये (ग्रॉस) इतकी आहे. याशिवाय, नॅशनल मल्टिप्लेक्समध्ये २८,००० तिकिटांची विक्री झाली आहे.तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाला देशभरात ११,३०० हून अधिक शो मिळाले असून रविवारपर्यंत ही संख्या २०,००० पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. (Salman khan)

    ===========================

    हे देखील वाचा:Salman khan : रिलीजपूर्वीच ‘सिकंदर’ची डॉलरमध्ये कमाई सुरु!

    ===========================

    ‘सिकंदर’ ३० मार्च २०२५ रोजी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी केले असून, सलमान खानसोबत रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, सत्यराज, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.(Sikandar movie advance booking)



Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते