Star Pravahकडून महिला दिनाची विशेष भेट; टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगणार अद्भुतपूर्व ‘महासंगम महानायिकांचा’ !

 



काय ह्या बायकांच्या सिरियल्स???
नवऱ्यांची लफडी
बायकाच बायकांच्या वैरी
का असतात अशा मालिका????
का वागतात अशा बायका???
कारण….
आजही जेव्हा हुंड्यासाठी जाळलं जातं बाईला,
किंवा मुलगा व्हावा म्हणून पाडलं जातं मुलीला
आजही जेव्हा कोणी उचलतं हात बाईवर,
किंवा राजरोसपणे अन्याय होतो तिच्यावर
तेव्हा तेव्हा एखादी जानकी, एखादी अबोली जन्म घेत असते
तिचं दुःख, तिचं जगणं आरसा बनून मांडत असते
बाईने उठावं, लढावं, झगडावं आपल्या हक्कासाठी
व्हावं मुक्ता, व्हावं मंजिरी किंवा कला आणि मानसी
घर नाती सांभाळत स्वतंत्र उभी राहावी ती
ह्याच साठी असते मालिकेतील स्त्री… ह्याच साठी असते मालिकेतील स्त्री…(Star Pravah Womens Day Special)

Star Pravah Womens Day Special

लेखिका आरती मनोहर यांनी लिहिलेली ही कविता स्टार प्रवाहच्या नायिकांचं अचूक वर्णन करते. या नायिका म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहेत. बहिण, पत्नी, आई, मुलगी, प्रेयसी अशी अनेक नाती आपण त्यांच्या रुपात नेहमी जगत असतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने याच नात्यांचा गौरव एका अनोख्या पद्धतीने होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा करण्याचा प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांमधला एक नवा प्रयोग म्हणजे ८ मार्चला सलग सात तास रंगणारा अद्भूतपूर्व महासंगम सोहळा. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग होणार आहे. कधीही न पाहिलेला आणि न ऐकलेला महानायिकांचा महासंगम सोहळा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. महिला दिनाच्या दिवशी स्टार प्रवाहच्या १४ मालिकांमधील १४ नायिका एकत्र येऊन हा खास दिवस आणखी खास करणार आहेत.(Star Pravah Womens Day Special)

===========================

हे देखील वाचा: Untavarche Shahane Marathi Movie: ‘उंटावरचे शहाणे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न!

============================

महिला दिनी होणाऱ्या या नव्या प्रयोगाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्त्री शक्ती आणि तिचं समाजातलं महत्व आपण जाणतोच. तिची ही ताकद फक्त महिला दिवसा निमित्त नाही तर स्टार प्रवाह नेहमीच साजरी करतं. याला दुजोरा देत आठ तारखेला महाराष्ट्राच्या या महानायिका एकत्र येऊन विश्वास, कर्तृत्व, प्रेम, आनंद, सहवास, कुटुंब, परंपरा, मान, अभिमान या सगळ्या भावना व्यक्त करत एकत्र येऊन एकमेकांना भेटून उभ्या महाराष्ट्राला एक मोठी पर्वणी देणार आहेत. लेखक, दिग्दर्शक, कलाकार,निर्माते आणि स्टार प्रवाह वहिनी एकत्र येऊन या गोष्टी सादर करत आहेत. रसिकांना हे नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे.’प्रवाह स्त्री शक्तीचा ८ मार्चला दुपारी १ ते ३ आणि संध्याकाळी ६.३० ते ११.३० पर्यंत पाहायला विसरु नका. ( Bollywood Tadka)

Original link is posted on : https://kalakrutimedia.com/a-special-womens-day-gift-from-star-pravah-to-the-audience-for-the-first-time-in-the-history-of-television-the-amazing-mahasangam-mahanayikancha-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते