Aaj Kay Banvuya: ‘आज काय बनवू या…? ‘मधुरा स्पेशल’ लवकरच येणार भेटीला; आता चवदार पाककृतींची रंगत अनुभवता येणार…
Sony Marathi नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. वेगवेगळे विषय, विविध मालिका आणि कार्यक्रम आजवर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. त्यांतच आता एक नवा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीनं आपल्या प्रेक्षकांसाठी खास आणला आहे. असं म्हणतात की, मनाचा मार्ग पोटातून जातो म्हंणूनच आपल्या अतूट नात्याची वीण आणखीन घट्ट करायला सोनी मराठी वाहिनी घेऊन आली आहे… ‘आज काय बनवू या…? मधुरा स्पेशल’. (Aaj Kay Banavuya? Madhura Special) Entertainment Mix Masala
या कार्यक्रमातून मधुरा बाचल (Madhura Bachal) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘आज काय बनवू या…? मधुरा स्पेशल’ या कार्यक्रमाच्या नावातूनच आपल्याला समजलं असेल की, हा कार्यक्रम कशावर आधारित आहे ते. महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या पाककृती आणि प्रेक्षकांचे आवडते पदार्थ करताना मधुरा बाचल या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. ‘मधुराज् रेसिपीज्’ या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मधुरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत.
आता या कार्यक्रमाद्वारे नक्कीच मधुरा आणि त्यांच्या पाककृती प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचतील. हा कार्यक्रम ५ मेपासून सोमवार ते शुक्रवार, दुपारी 1 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रभरातले वेगवेगळ्या प्रांतांतले विशेष असे खाद्यपदार्थ आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमातल्या स्वयंपाकघरात आपल्याला नको-नको ते आगीचे खेळ नसतील. पारंपरिक स्वयंपाकाचा चविष्ट मेळ नक्कीच पाहायला मिळेल. (Aaj Kay Banavuya? Madhura Special) Bollywood Masala
==============================
==============================
झटपट मेजवान्या झडताना दिसतील, मिरची नात्यात नाही तर फोडणीमध्ये दिसेल. सेलिब्रिटीज्ची कमी भासणार नाही कारण आपल्या खमंग मेजवान्या याच या कार्यक्रमाच्या सेलिब्रिटीज् असतील. आपल्याकडे ड्रामा कमी आणि रेसिपीज् फार असणार…दर्जेदार चवीचा, मराठमोळा साज असणार…! रुचकर चवीची पंगत… नात्यांमध्ये विणू या! सांगा तर मग ‘आज काय बनवू या…? मधुरा स्पेशल’ ५ मेपासून दुपारी 1 वाजता, सोनी मराठी वाहिनीवर…!
Original content is posted on https://kalakrutimedia.com/aaj-kay-banvuya-madhura-special-to-hit-the-screens-soon-now-you-can-experience-the-color-of-delicious-recipes-info/
Comments
Post a Comment