Ind vs Pak conflict: “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम”; कलाकारांनी केलं सैन्याचं कौतुक

 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मोहिम राबवून पाकिस्तानला सणसणीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ८ मे २०२५ पासून भारत-पाकिस्तान सीमेवर घमासान युद्धाला सुरुवात झाली असून भारतीय सैन्याने पाकिस्तानची पळताभूई थोडी करुन ठेवली आहे. तेथे बॉर्डवर सैन्य दिवस-रात्र एक करुन शत्रुशी लढत असताना देशातील सामान्य नागरिकांसह कलाकार देखील भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जाणून घेऊयात कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. (India Pakistan War) Bollywood Masala

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची बायको जिनिलिया देशमुख यांनी भारतीय सैन्याचे कोतुक करणारी पोस्ट केली आहे. रितेशने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना माझा सलाम. आपले सैनिक आपल्याला सुरक्षा देण्यासाठी निडरपणे आणि बेधडकपणे शत्रूंचा सामना करत आहेत. इंडियन आर्मी जिंदाबाद.” याशिवाय रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीयाने सुद्धा भारतीय सैन्याची गौरवगाथा मांडणारी पोस्ट लिहिली आहे. तर जिनिलीया देशमुखने लिहिले आहे की, “भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला आणि हुशारीला सलाम. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी आम्ही प्रार्थना करतो”. Riteish Deshmukh and Genelia Deshmukh)

अभिनेते अनिल कपूर लिहितात, “आम्हाला सुरक्षा देणाऱ्या भारतीय सेनेतील सर्व बहादूर आणि धाडसी पुरुषांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो”. तर २०१७ मध्ये भारतासाठी मिस वर्ल्ड हा किताब जिंकणाऱ्या मानुषी छिल्लरने पोस्ट करत लिहिले की, “संरक्षण मंत्रालयात ३ दशके काम करणाऱ्या एका डॉक्टरची मुलगी आणि एका लष्करी अधिकाऱ्याची भाची म्हणून, आपल्या सशस्त्र दलांनी देशाची सेवा करण्यासाठी जे बलिदान दिले आहे त्याबद्दल मला अत्यंत आदर आणि कौतुक आहे. नेहमीच आमचे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद”. (Anil kapoor)

================================

हे देखील वाचा: Operation Sindoor : देशातील तणाव पाहता राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही!

=================================

तर मुळचे जम्मू कश्मिरचे असणारे अनुपम खेर म्हणतात, “माझ्या भावाने मला जम्मू-कश्मिरमध्ये होणाऱ्या हल्ल्याचा व्हिडिओ पाठवला. तो पाहून मी त्यांना त्वरित फोन केला आणि परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना माझा भाऊ म्हणाला, भैया आम्ही भारतात आहोत. आम्ही हिंदुस्तानी आहोत.आमची सुरक्षा भारतीय सैन्य आणि माता वैष्णोदेवी करत आहे. तुम्ही काळजी करु नका. आणि तसंही एकही मिसाईल आम्ही जमिनीवर येऊ देणार नाही. भारत माता की जय!” (Anupam kher) Bollywood Tadka

दरम्यान, भारत-पाकिस्तान मध्ये सुरु असलेल्या या युद्धात संपूर्ण देश भारतीय सैन्यासोबत असून प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी चोख पाळण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सिनेसृष्टीतील कलाकार देखील यात सहभागी आहेत. (Entertainment news)

Original content is posted on https://kalakrutimedia.com/india-pak-war-and-indian-celebrity-reaction-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Preamachi Gosht 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित