Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”; मराठी अभिनेत्रीने सांगितला अनुभव

 

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच कसोटी क्रिकेट सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहिर केली. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, आजवरच्या त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीचे लोकं कौतुक करत विराटला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत. बरं, विराट कोहली केवळ क्रिकेटपटू नसून जाहिरात क्षेत्रातीलही फार मोठं नाव आहे. बड्या बड्या ब्रॅण्ड्सचा तो अॅम्बॅसेडर देखील आहे. पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) अनेक अभिनेत्रींसोबत तो विविध जाहिरातींमध्ये झळकला आहे. पण तुम्हाला माहित हे का नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने विराट कोहलीसोबत जाहिरात केली असून त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना नर्वस होती अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.(Bollywood) Bollywood Tadka

तर, विराट कोहलीसोबत जाहिरात करणारी अभिनेत्री आहे ‘राधा ही बावरी’ मालिका फेम श्रुती मराठे (Shruti Marathe) . एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं होतं की, “विराट कोहलीसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा आणि पटापट शूट करुन त्यांना जाऊ द्या असं वातावरण असेल असं मला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात तो खूप चिल्ड आऊट होता. कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि विराट (Virat Kohli) दोघंही होते. दोघंही इतके टाईमपास गप्पा मारत होते. म्हणजे एक वेळ तर अशीही होती की ते चक्क मीम्सवरही चर्चा करत होते.  मला असं वाटलं की अरे सोशल मीडियावर काय चालू आहे, कोणतं मीम मजेशीर आहे कोणतं व्हायरल झालं आहे यावर त्यांचं पण लक्ष असतं. हे बघून मला आश्चर्यच वाटलं.” (Entertainment)

दरम्यान, श्रुती मराठे केवळ मराठीच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही छोटेखानी पण ठसठशीत भूमिका साकारताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘देवारा’ या चित्रपटात ज्युनिअर एन.टी.आरच्या (Jr NTR) बायकोची भूमिका तिने साकारली होती.

================================

हे देखील वाचा: Banjara Marathi Movie: निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित !

=================================

भारतीय चित्रपटसृष्टीत कलाकारांची खरी नावं आणि स्क्रिनवरील नावं वेगवेगळी होती आणि आहेतही. त्याचप्रमाणे श्रुतीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव श्रुती प्रकाश (Shruti Prakash) असं आहे. आणि केवळ ‘देवारा’ (Devara 1) चित्रपटच नव्हे तर ‘इंदिरा विझा’, ‘Naan Avanillai 2’, ‘Aravaan’, ‘Aadu Aata Aadu’ अशा तमिळ आणि कन्नड चित्रपटांतही तिनं कामं केली आहेत. (Shruti marathe south indian film list) Latest Marathi Movies

Original content is posted on https://kalakrutimedia.com/shruti-marathe-advertisement-with-virat-kohli-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई