Arun Kadam : मुलीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची वेळ का आली?
आपल्या मुलांना कुठल्याच अडचणींचा कधीच एकट्याने सामना करावा लागू नये अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते… त्यामुळे आपल्या मुलांना सगळ्या सुख-सोयी देण्याचा पुरेपुर प्रयत्न पालक करत असतात… असाच काहीसा कठिण प्रयंग मनोरंजनसृष्टीतील दादुस अर्थात अरुण कदम यांच्या लेकीवर ओढवला होता… लेकीला वाचवण्यासाठी चक्क अरुण कदम यांनी हेलिकॉप्टर पाठवलं होतं… काय घडलेला किस्सा जाणून घेऊयात…(Entertainment tadaka)
लोकशाहीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अरुण कदम यांची मुलगी सुकन्या हिने तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. सुकन्या म्हणाली की, “मी आणि वैशाली शिमल्याला गेलेलो, तेव्हा खूप स्नो फॉल झाला होता. सगळी वाहतूक, रस्ते बंद झाले होते. आम्ही हॉटेलमध्ये अडकलो होतो. आणि स्नो फॉलमुळे रस्ते बंद असल्याकारणाने गाडी पण आमची निघू शकत नव्हती… पप्पांचं शुटींग चालू होतं म्हणून आमच्यासोबत ते आले नव्हते… आम्ही अडकलोय हे समजल्यावर त्यांचं काळीज वर खाली होऊ लागलं… आम्हाला तिथून सुखरुप बाहेर काढण्यासाठी बऱ्याच लोकांना फोन करुन शिमल्यात आमच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं होतं..(Bollywood news) Latest Marathi Movies
================================
हे देखील वाचा: Jarann Movie: सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले करणार प्रेक्षकांवर ‘जारण’
=================================
पुढे सुकन्या म्हणाली की, “मला नाही माहिती नेमकं त्यांनी हे कसं अरेंज केलं होतं. तेव्हा वाटलं की, बाबा इथून आपल्याला बाहेर काढू शकतो तर कुठूनही काढू शकतो”. दरम्यान, मध्यंतरी सुकन्या अरुण कदम हिचं लग्न सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालं होतं… आणि अरुण कदम यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात आपल्या सहज-सुंदर अभिनयाने अरुण कदम प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. अरुण यांनी आजवर खेळ मांडला, येरे येरे पैसा, कोण आहे रे तिकडे, दिल तो बच्चा है जी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या…(Marathi movies) Entertainment Mix Masala
Original content is posted on https://kalakrutimedia.com/actor-arun-kadam-is-an-leading-comedy-actor-from-marathi-film-and-serials/
Comments
Post a Comment