Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!
अभिनय आणि आपल्या नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चित्रपटांसोबत अध्यात्म्यात गुंतली आहे… काही दिवसांपूर्वीच तिने सहकुटुंब केदारनाथला जाऊन शंकराचं दर्शन घेतलं होतं…तिच्यासोबत या स्पिरिच्युअल जर्नीत अमृता खानविलकर देखील दिसली होती… पण तु्म्हाला माहित आहे का प्राजक्ता माळी हिचं पंढरपूरशी खास नातं आहे.. जाणून घेऊयात त्याबद्दल…(Marathi Entertainment News) Bollywood Tadka
सध्या संपू्र्ण महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे… लाखोंच्या संख्येने हजारो वारकरी अभंग गात वारीत सहभागी झाले आहेत.. आणि याच भक्ती भावनेने वेढलेल्या पंढरपूरसोबत प्राजक्ताचं जीवाभावाचं नातं आहे… पंढरपूर हे प्राजक्ताचं आजोळ आहे. पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यात भाळवणीत तिचं आजोळ असून प्राजक्ता आवर्जून तिच्या बिझी स्केड्युलमधून वेळ काढून आजोळी कायम जाते.. भाळवणी हे गाव कावड यात्रेसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे प्राजक्ता या कावड यात्रेला सहकुटुंब हजेरी लावत असते…(Latest Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….
=================================
प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं ती सुत्रसंचलन करत असून फुलवंती चित्रपटातून तिने काही महिन्यांपूर्वी निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं होतं….तसेच, चिकी चिकी बबूम बूम या चित्रपटात ती झळकली होती.. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट पाहात असून लवकरच नव्या प्रोजेक्टची अपेक्षा केली जात आहे… Bollywood Masala
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/prajakta-mali-has-connection-with-pandharpur/
Comments
Post a Comment