The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु राजगुरु यांच्यात सामना!
महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कलावंतांचा गुणगौरव राज्य पुरस्कार देत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नामांकित निर्मिती संस्थासोबत यंदा वर्ध्यातील दिग्दर्शक हरिष इथापे यांच्या तेरवं चित्रपटाची वर्णी लागली आहे. जाणून घेऊयात इतर नामांकनं…(The Maharashtra State Film Awards) Bollywood Masala
६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने पटकावणारे चित्रपट पुढीलप्रमाणे; ‘आत्मपॅम्प्लेट’, ‘जिप्सी’, ‘नाळ २’, ‘रौंदळ’, ‘तेरवं’, ‘जग्गु’ आणि ‘ज्युलिएट’, ‘भेरा’, ‘आशा’, ‘झिम्मा २’ आणि ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’. यासोबत कबीर खंदारे (‘जिप्सी’) आणि त्रिशा ठोसर (‘नाळ २’) या बालकलाकारांनीआपल्या अभिनयानं रसिकांच्या हृदयात घर केलं असून, त्यांना उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.(Marathi Movies 2025)
===============================
===============================
तसेच, राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री या विभागात श्रीधर वाटसर, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव या अभिनेत्यांमध्ये तगडी स्पर्धा आहे. तर अभिनेत्री विभागात किरण खोजे, वैदही परशुरामी आणि रिंकू राजगुरू यांच्यात अटीतटीचा सामना आहे. तसेच, विनोदी भूमिकांमध्ये निर्मिती सावंत, नम्रता संभेराव, उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, गिरिश कुलकर्णी यांची नावं समोर आली आहेत. आणि विशेष म्हणजे ‘हजार वेळा शोले’ पाहिलेला माणूस’, ‘शॉर्ट अँड स्वीट’ आणि ‘जिप्सी’ यांसारख्या चित्रपटांनी प्रथमच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवून नामांकन मिळवलं आहे. त्यामुळे आता ६१व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.(Marathi Entertainment News) Entertainment Mix Masala
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/nomination-list-of-61st-state-awards-for-marathi-films/
Comments
Post a Comment