Vidya Balan ची मराठी मालिकेत दमदार एंट्री ; ‘या’ मालिकेत झळकणार शिक्षिकेच्या भूमिकेत !

 नेहमीच आपल्या भूमिकांमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.आज ती बॉलिवूडमधील एक यशस्वी, दमदार आणि वैविध्यपूर्ण अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप काही झेलावं लागलं आहे. विद्याने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली. ‘हम पांच’या लोकप्रिय मालिकेमधून तिनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत ती अशोक सराफ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. चित्रपटसृष्टीकडे वळल्यावर तिला लगेच संधी मिळाली नाही. अनेक चित्रपटांमधून नकार मिळाले, काही प्रोजेक्ट्स अर्धवट राहिले, तर काहींमध्ये तिला बदलून टाकण्यात आलं. तरीही तिनं हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, स्वतःवर विश्वास ठेवत तिनं संघर्ष सुरू ठेवला.आज तिचं नाव ‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘परिणीता’, ‘तुम्हारी सुलु’ सारख्या अनेक हिट आणि स्त्रीप्रधान सिनेमांसोबत घेतलं जातं. 2005 साली आलेला ‘परिणीता’ हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.या चित्रपटात विद्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं आणि बॉलिवूडमध्ये तिचं नाव ‘सशक्त अभिनेत्री’ म्हणून घेतलं जाऊ लागलं. ‘परिणीता’नंतर विद्याने मागे वळून पाहिलं नाही. एकामागोमाग एक दमदार सिनेमे आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिका तिच्या वाट्याला आल्या.(Vidya Balan First Marathi Serial) Latest Marathi Movies

Vidya Balan First Marathi Serial

नुकतीच विद्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक मजेशीर मराठी reel शेअर केली होती . या व्हिडीओमधून तिनं “लवकरच मराठीत काहीतरी नवीन करणार आहे” असा स्पष्ट संकेत दिला आहे. त्यानंतरच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती . “विद्या बालन कोणत्या मराठी सिनेमात झळकणार?” “तिची भूमिका काय असेल?” याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती. आणि मग काही दिवसांपासून विद्या बालन मराठीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चर्चांवरच उत्तर समोर आले आहे.

Vidya Balan First Marathi Serial

विद्या कोणत्याही मराठी चित्रपटातून नव्हे, तर थेट मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कमळी’ या नवीन मालिकेमधून ती शिक्षिकेची भूमिका साकारत आहे आणि ती झळकणार आहे थेट झी मराठीवर! आजपासून सुरू होणाऱ्या या मालिकेचा प्रोमो झी मराठीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विद्या एका विद्यार्थिनीला म्हणजेच कमळीला शिकवताना दिसते. दोघींच्या संवादात मराठीतील म्हणींची गमतीशीर चुरस पाहायला मिळते आणि तिथेच विद्याचा खास अंदाज प्रेक्षकांना खूप भावतो आहे.(Vidya Balan First Marathi Serial)

================================

हे देखील वाचा: ‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni ने स्पष्टच  सांगितलं… 

=================================

या प्रोमोनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काहींनी विद्याच्या मराठी उच्चारांचं कौतुक केलंय, तर काहींनी म्हटलं “मराठी मालिकांमध्ये आता दर्जा आणखीनच वाढणार!” ‘कमळी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे विजया बाबर, जी या आधी ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत चांदुलच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली होती. आणि छोट्या बायोची मोठी स्वप्न या मालिकेत ती मोठ्या बायोच्या भूमिकेत दिसली होती. आता ती ‘कमळी’च्या रूपात नव्या कहाणी घेऊन प्रेक्षकांसमोर येतेय. Box Office Collection

Original content is posted on https://kalakrutimedia.com/vidya-balan-makes-a-powerful-debut-in-marathi-tv-to-play-a-teacher-in-kamali-serial-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Preamachi Gosht 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित