Ekta Kapoor : सरकारची ALTT सह २५अ‍ॅप्सवर बंदी; एकता कपूरची प्रतिक्रिया आली समोर

 अश्लील कंटेट दाखवणाऱ्या apps वर केंद्र सरकारने बंदीची ठोस पावले उचलली असून अल्टसह २५ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. दरम्यान, हा महत्वपुर्ण निर्णय डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण आणण्यासाठी आणि समाजातील अश्लीलतेला आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे अल्ट App हे एकता कपूर (Ekta Kapoor) यांचं असून याबद्दल त्यांनी एका एक महत्वाची अपडेट दिली आहे… एकता कपूर यांनी त्यांचा किंवा आई शोभा कपूर यांचा ALTT अ‍ॅपशी आता काहीही संबंध उरलेला नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे… त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जून २०२१ मध्येच आम्ही ALTT पासून वेगळे झालो असून या प्लॅटफॉर्मच्या सध्याच्या व्यवस्थापनात आमची कोणतीही भूमिका नाही.’ (Entertainment News) Celebrity Interview

दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार ALTT सह ULLU, Big Shots, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App आणि Jalva App यांसारख्या २५ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.  तसेच, बालाजी टेलिफिल्म्सनेही एक निवेदन जारी करून आपली बाजू स्पष्ट करत अलं लिहिलं आहे की, ‘कंपनी नेहमीच कायदेशीर नियमांचे पालन करते आणि उच्च दर्जाचा कंटेंट तयार करण्यावर भर देते. ALTT आता आमच्या कार्यक्षेत्रात नाही, त्यामुळे त्यावर असलेल्या बंदीशी आमचा काहीही संबंध नाही.’ याआधीही ALTT वरील बोल्ड कंटेंटवरून अनेकदा वाद निर्माण झाले होते. स्वतः एकता कपूरने यावर प्रतिक्रिया देताना मान्य केलं होतं की प्लॅटफॉर्म सुरू करताना तिने प्रेक्षकांसाठी काही धाडसी कंटेंट तयार केला होता. (Adult Content control on internet)

================================

हे देखील वाचा: Saiyaara Movie : बॉलिवूडमध्येही काका-पुतण्या वाद? चंकी पांडेंची ओळख दाखवायला अहानने एकेकाळी दिलेला नकार

=================================

आता, केंद्र सरकारच्या या बंदीमुळे ALTT सह इतर प्लॅटफॉर्मवरील आगामी प्रोजेक्टवरही परिणाम झाला आहे. कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्या अडकलेलया प्रोजेक्टबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असून यापेक्षा अधिक लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे… (Bollywood news) Entertainment Mix Masala

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/altt-app-banned-by-central-government-ekta-kapoor-reacts-to-her-relation-with-app-management/





Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Chala Hava Yeu Dya 2: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील वनिता खरातची ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये होणार एण्ट्री?