Metro In Dino चित्रपटाने दोन दिवसांत किती कमाई केली?

 दिग्दर्शक अनुराग बासू यांनी आजवर ‘बर्फी’, ‘गॅग्स्टर’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत… २००७ मध्ये ‘लाईफ इन अ मेट्रो’ ( Life In A Metro) या चित्रपटाने जर प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण केली होती.. आता तब्बल १८ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल ‘मेट्रो इन दिनों’ (Metro In Dino) रिलीज झाला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घेऊयात…



सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,’मेट्रो इन दिनों’ (Metro In Dino) चित्रपटाने पहिल्या दिवशी३.५ कोटी, दुसऱ्या दिवशी१.८९ कोटी कमवत दोन दिवसांत या चित्रपटाने एकूण५.३९ कोटींची कमाई केली आहे… जवळपास ८० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने इतकी तुटपुंजी सुरुवात केल्यामुळे हा चित्रपट बजेटची रक्कम तरी रिकव्हर करेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे…Latest Marathi Movies



‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल, अनुपम खेर आणि नीना गुप्ता हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. तर १८ वर्षांपूर्वी आलेल्या लाईफ इन अ मेट्रो या चित्रपटात इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, के के मेनन, शायनी आहुजा, शिल्पा शेट्टी, कंगना रणौत आणि शर्मन जोशी हे कलाकार होते…(Metro In Dino Movie cast)

================================

हे देखील वाचा: Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती

=================================

दरम्यान, अनुराग बासू यांच्या चित्रपटांबद्दल बोलायाचं झालं तर आत्तापर्यंत त्यांनी ‘साया’, ‘मर्डर’, ‘काईट्स’ ( Kites Movie), ‘तुमसा नही देखा’, ‘जग्गा जासूस’, ‘लुडो’ (Ludo Movie) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे…(Anurag Basu Movies) Bollywood Tadka

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/metro-in-dino-movies-box-office-collection/








Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई