Nivedita Saraf आणि गिरीश ओक ही जोडी पुन्हा एकदा दिसणार एकत्र!
अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक ‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत… लवकरच हे दोन दिग्गज कलाकार ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातील प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. आता सोशल मीडियावर या चित्रपटाचं दुसरं पोस्टर झळकलं आहे. (Marathi Movie 2025)
‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाच्या या मोशन पोस्टरमध्ये सोफ्यावर बसलेल्या निवेदिता सराफ यांच्या डोक्यावर मुंडावळ्या दिसत आहेत, परंतु चेहऱ्यावर नवरीसारखी लाजरीबुजरी नाही तर मिश्किल शांतता आहे. त्यांच्यामागे गिरीश ओक अत्यंत खुश चेहऱ्याने हात दाखवून काहीतरी सांगू पाहात आहेत. हे दृश्य पाहून नक्की एक लक्षात येतंय की हे पारंपरिक जोडपं नाहिये पण नक्कीच काहीतरी हटके कॅमेस्ट्री असणार आहे… (Entertainment) Entertainment Mix Masala
या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद इंगळे यांनी केलं असून त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ”आजच्या पिढीला नात्यांबाबत स्पष्टता आहे, पण लग्नाविषयी गोंधळही आहे. काही वेळा प्रेम, मैत्री आणि जबाबदारी ही लग्नाच्या साच्यात न बसताही खूप सुंदर नातं उभारते, ‘बिन लग्नाची गोष्ट’ त्याचं एक हलकंफुलकं, तरीही अर्थपूर्ण प्रतिबिंब आहे. निवेदिता सराफ, गिरीश ओक, प्रिया बापट, उमेश कामत हे चौघेही जबरदस्त कलाकार आहेत. त्यांच्या अप्रतिम अभिनयाने ही गोष्ट अधिकच जिवंत झाली आहे.”
================================
हे देखील वाचा: उमेश कामत आणि प्रिया बापट यांची प्यारवाली लव्हस्टोरी
=================================
गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Box office collection
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/bin-lagnachi-goshta-marathi-movie-starcast-nivedita-saraf-and-girish-oak/
Comments
Post a Comment