Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !
Zee Marathi वर प्रेक्षकांच्या मनात घर केलेला आणि खाद्यप्रेमींच्या खास पसंतीस उतरलेला शो ‘आम्ही सारे खवय्ये’ आता पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी या पर्वाची थीम असणार आहे ‘जोडीचा मामला’. जिथे आपले आवडते सेलिब्रिटी जोडपे एकत्र किचनमध्ये उतरणार आहेत, मजा करणार आहेत आणि अर्थातच, स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल घडवणार आहेत.पदार्थ हे निमित्त असणार, पण खरी मेजवानी असेल त्या जोडप्यांमधील नात्यांची. त्यांच्या आठवणी, प्रेमाचे क्षण, आणि कौटुंबिक परंपरांमधून आलेल्या खास पाककृती, हे सगळं प्रेक्षकांना एका आंबट-गोड प्रवासावर घेऊन जाणार आहे.(Aamhi Saare Khavayye)
या पर्वात प्रत्येक भागात एक नवीन सेलिब्रिटी जोडपं सहभागी होणार आहे. ते फक्त पाककृती बनवणार नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी, किस्से आणि आठवणी शेअर करणार आहेत. कधी त्यांची प्रेमकहाणी, कधी लग्नानंतरची पहिली पुरणपोळी, तर कधी झणझणीत मिसळमधून उमटलेला नात्याचा पहिला ठसका. हे सगळं त्यांच्या खास शैलीत उलगडलं जाणार आहे.स्वयंपाक करतानाची दोघांमधली केमिस्ट्री, त्यांच्यातल्या मिश्किल टोमण्यांमधून उमटणारं प्रेम, आणि त्या गप्पांमधून दिसणारी आपुलकी हे सगळं प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आपलंसं वाटेल. या पर्वात प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या विविध भागातील पारंपरिक चवांचाही खास अनुभव मिळणार आहे, कारण प्रत्येक जोडपं आपल्या प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करणार आहे. Latest Marathi Movies
या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा आपल्या लाडक्या संकर्षण कऱ्हाडेकडेच आहे. या खास पर्वाबाबत तो म्हणतो की, “खरं सांगायचं तर, स्वयंपाकघर हे फक्त चविष्ट पदार्थ बनवण्याचं ठिकाण नसतं, तिथे रोजच्या आयुष्यातले खास क्षण तयार होत असतात. दोन माणसं एकत्र जेव्हा काहीतरी बनवतात, तेव्हा ताटात फक्त जेवण नसतं, तर त्यांचं नातंही आणखी घट्ट झालेलं असतं.” (Aamhi Saare Khavayye)
==================================
हे देखील वाचा: Aatli Batmi Futali: ‘सखूबाई’ गाण्यात दिसणार गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा !
==================================
संकर्षण पुढे अस ही म्हणतो की, “हे नवीन पर्व म्हणजे त्या नात्यांचा आणि आठवणींचा एक गोड सुगंध आहे. कुणाचं लग्न झाल्यावर पहिलं पुरणपोळीचं जेवण, कुणाचा पहिला झणझणीत मिसळ खाल्ल्याचा किस्सा, आणि त्यामागच्या मजेदार गप्पा हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. ही फक्त पाककृतींची सफर नाही, ही आहे प्रेम, स्नेह आणि संस्कृती यांची चविष्ट गोष्ट!”तर मग, सेलिब्रिटी जोड्यांच्या खास रेसिपीज, त्यांच्या मजेशीर आठवणी आणि महाराष्ट्राच्या परंपरांची ही चविष्ट सफर अनुभवण्यासाठी ‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला’,९ ऑगस्टपासून, दर शनिवार आणि रविवार, दुपारी १ वाजता, झी मराठीवर पहायला मिळणार आहे. Latest Marathi Webseries
Original content is posted on https://kalakrutimedia.com/aamhi-saare-khavayye-returns-with-jodicha-mamla-a-flavorful-comeback-full-of-celebrity-recipes-and-heartwarming-stories-info/
Comments
Post a Comment