Dilip Prabhavalkar : दशावतार चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज; बाप – मुलाच्या धमाल नात्याची दिसली झलक

 ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतार चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे… लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असून आता यातील आजोबा आणि नातवाचं नातं दाखवणारं एक गाणं रिलीज झालं आहे… ‘आवशीचो घो’ असे गाण्याचे बोल असून या आगळ्यावेगळ्या गाण्याने कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडाने वापरला जाणारा शब्द आहे. मालवणी भाषेत आईला प्रेमाने आवशी आणि नवऱ्याला घो असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडीलांना प्रेमाने ‘आवशीचो घो’ म्हणायची पद्धत आहे. दशावतार चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे. Latest Marathi Movies

दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे. हे गाणं वर वर पाहता मिश्किल किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी ते गाणं बाप – मुलाच्या नात्याचं सारच मांडतं. विशेष म्हणजे यात कधी कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेणारा ‘वडील’ बनतो आणि वडील त्याचे ‘मूल‘ होतात. बाप मुलाच्या नात्याचं हळूवारपण उलगडणारं हे गाणं प्रेक्षकांना फार आवडत आहे…

================================

हे देखील वाचा : Dilip Prabhavalkar : ‘कांतारा’ चित्रपटाची Vibe देणारा ‘दशावतार’!

=================================

दरम्यान, दशावतार चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे… या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. Box office collection

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/dashavatar-movie-new-song-release/






Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Chala Hava Yeu Dya 2: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील वनिता खरातची ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये होणार एण्ट्री?