Shah Ruk Khan : “राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी एक हात…”
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) ३० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि रोमॅंटिक अंदाजाने भूरळ पाडतोय… इतकी वर्ष काम केल्यानंतर अखेर शाहरुखला जवान चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे… या पुरस्काराबद्दल किंग खान याने मुलगा आर्यन खान याच्या आगामी त्याचा ‘Ba**ds of Bollywood’ या पहिल्या नेटफ्लिक्स शोच्या प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंटवेळी प्रतिक्रिया दिली आहे… सध्या तो मुलगी सुहाना खान सोबत किंग चित्रपटाचं शुटींग करत असून यावेळी त्याच्या हाताला दुखापत झाली आहे… हाताला झालेली दुखापत आणि राष्ट्रीय पुरस्कारावर शाहरुखने त्याच्या खास शैलीत भाष्य केलं आहे…(Bollywood News) Box office collection
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून त्याचा ‘Ba**ds of Bollywood’ हा पहिल नेटफ्लिक्स शो लवकरच रिलीज होणार आहे…. नुकताच या शोचा प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंट संपन्न झाला… हाताला दुखापत झाली असूनही आपल्या मुलाच्या यशात सहभागी होण्यासाठी शाहरुख आणि गौरी खान (Gauri Khan) उपस्थित होते… यावेळी त्याने मिश्किलपणे दुखापतीबद्दल बोलताना ‘जवान’साठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला की, , “तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या मनात खूप प्रश्न असतील. म्हणून मी आधीच उत्तर देतो. माझ्या हाताला काय झाले आहे? माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. छोटीशी शस्त्रक्रिया झाली, खरं तर थोडी मोठीच सर्जरी झाली. बरे होण्यासाठी मला १-२ महिने लागतील. पण राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात पुरेसा आहे. पण फक्त तुमचे प्रेम स्वीकारताना दुसऱ्या हाताचीही कमतरता जाणवते”. दरम्यान, शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी त्याच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय. (National Awards 2025)
================================
=================================
शाहरुख खान याने २०२३ मध्ये ‘डंकी’ (Dunky) चित्रपटात काम केले होते… त्यानंतर तो सुहाना खानसोबत ‘किंग’ (King Movie) चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे… या चित्रपटात अभिषेक बच्चन, दिपीका पादूकोण यांचीही प्रमुख भूमिका असणार आहे… त्यामुळे पहिल्यांदाच बाप-लेकीला स्क्रिनवर पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते उत्सुक आहेत… Entertainment mix masala
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/one-handed-shah-rukh-khan-can-do-bahut-kuch-national-award-bhi-utha-sakta-hoon/
Comments
Post a Comment