‘मराठी लोकांचे वरण-भात म्हणजे गरिबांचं जेवण…’; काय बोलून गेले Vivek Agnihotri

 ‘द कश्मिर फाईल्स’, ‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या चांगलेच चर्चेत आहेत… नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे पती असणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी मराठी पदार्थांना गरीबांचं जेवन असं म्हटल्यावर लोकांचा रोश जितका विवेक यांच्यावर होता तितकाच पल्लवी यांनी ते विधान ऐकून कसं घेतलं यावरही होता.. नेमकं विवेक अग्निहोत्री काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…Box office collection

तर, विवेक अग्निहोत्री यांनी कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत मराठी जेवणाबद्दल भाष्य केलं आहे. वरण-भात म्हणजे गरिबांचं जेवण असल्याचं त्यांनी म्हटलं हे. त्यांच्या या वक्तव्यावरुन लोकांचा रोष त्यांनी पत्करला आहे… मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आहे. लग्नानंतर घरी मराठी पदार्थ बनू लागल्यानंतर विवेक यांची प्रतिक्रिया काय होती, या बाबत पल्लवी जोशींना विचारलं असता त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा पण मराठी जेवण बनवायचे ते त्यांना कधीच आवडायचे नाही. ते नेहमी काय हे गरिबांचं जेवण बनवलंय असं म्हणायचे”.

विवेक अग्निहोत्री म्हणाले की,“मी दिल्लीचा असल्यानं कबाब, मटण, चिकण, असं तेलाचा थर असलेलं जेवणं करायची सवय. आता वरण भात त्यांच्या वरणात मीठ देखील नसते. यांची कढीपण एकदम साधी. कढी म्हटलं की माझ्या डोळ्यावर तेलाचा थर तरंगतोय लाल मिरची असं दिसतं पण यांची कढी पण एकदम साधी. हे फुड कल्चर पाहून खरं तर मला धक्काच बसलेला. हे लोक शेतकऱ्यासारखे गरिब जेवण जेवतात, कोणाशी लग्न केलंय मी, असा विचार केला”.(Latest Entertainment News)

================================

हे देखील वाचा : Supriya : चमेलीच्या भूमिकेत सुप्रिया नाही तर पल्लवी जोशी असत्या?; काय आहे किस्सा…

=================================

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून अनेकांनी म्हटलं आहे की, तुझ्या बायकोला चांगलं मराठी जेवण बनवता येत नाही त्याला आम्ही काय करू. वरण भात हे सात्विक अन्न आहे. वरण भात, तुपाची धार आणि लोणचं हे बहुतेकांचं आवडतं जेवण आहे. त्यालाच नावं ठेवतोस, असंही एकाने कमेंट करत म्हटलं आहे. तसेच, काहींनी थेट पल्लवी जोशी यांना देखील धारेवर धरलं असून पतीने आपल्या मराठी जेवणाला नावं ठेवूनही पल्लवी कसं त्यांना काही म्हणाल्या नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे…(Vivek Agnihotri News) Celebrity interviews

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/yeh-toh-kisaano-jaisa-gareeb-khaana-khaate-hai-the-bengal-files-director-vivek-agnihotri-reveals-he-didnt-like-maharashtrian-food/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Chala Hava Yeu Dya 2: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील वनिता खरातची ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये होणार एण्ट्री?