Alka Kubal : ‘माहेरची साडी’ चित्रपट आधी ‘या’ हिंदीतील अभिनेत्रीला झालेला ऑफर!

 मराठी चित्रपटसृष्टीत आजवर बरेच कल्ट चित्रपट येऊन गेले… मात्र, ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi movie) या चित्रपटाचा रेकॉर्ड कोणताच चित्रपट मोडू शकत नाही… बॉक्स ऑफिस कलेक्शन नाही तर जितकं प्रेम आणि प्रतिसाद अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या माहेरची साडी चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला होता तितका आजवर कुठल्या चित्रपटाला मिळाला असेल यात जरा शंकाच आहे… प्रेक्षकांनी सगळ्याच मराठी चित्रपटांवर भरभरुन प्रेम केलं पण ‘माहेरची साडी’ हा जरा खास चित्रपट आहे हे निश्चितच… १८ सप्टेंबर १९९१ रोजी रिलीज झालेल्या विजय कोंडकेंच्या या चित्रपटाला आज ३४ वर्ष पूर्ण झाली… मराठीतील ऑल टाईम सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली होती… पण तुम्हाला माहित आहे का अलका कुबल नाही तर एक वेगळीच अभिनेत्री या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती होती?(Marathi cult classic movies) Box office collection

‘माहेरची साडी’ या चित्रपटात अलका कुबल (Alka Kubal) यांनी सोशिक सुनेची भूमिका साकारली होती… खरं तर या चित्रपटामुळे अलका यांना महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिलं… परंतु, आधी या भूमिकेसाठी अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) हिची निवड दिग्दर्शकांनी केली होती… कारण त्यावेळी ‘मैने प्यार किया’ (Maine Pyaar Kiya) हा भाग्यश्रीचा चित्रपट हिंदीत सुपरहिट ठरला होता… त्या चित्रपटातील भाग्यश्रीचं सोज्वळ रुप प्रेक्षकांना भावलं होतं… त्यामुळे ‘माहेरची साडी’ चित्रपटात भाग्यश्रीचा चेहरा अगदी योग्य असेल असं दिग्दर्शकांना वाटलं… तिला चित्रपटासाठी विचारणा देखील केली होती…


मात्र, वर्ष उलटून गेलं तरी तिच्याकडून उत्तर काही आलं नाही… आणि अखेर दिग्दर्शक विजय कोंडकेंनी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला… ९०च्या दशकात नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये अलका कुबल यांनी आपलं प्रस्थ निर्माण केलं होतं… आणि अखेर माहेरची साडी चित्रपट त्यांच्या पदरात पडला आणि अक्षरश: मराठी चित्रपटसृष्टीच्या आणि त्यांच्या स्वत:च्या करिअरमधील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला…(Bollywood News) Latest Marathi Movies

================================

हे देखील वाचा : दादा कोंडके यांनी ‘माहेरची साडी’ हा सिनेमा स्वत: का बनवला नाही?

=================================

‘माहेरची साडी’ या चित्रपटाबद्दल खरं तर अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत… ज्या चित्रपटाने प्रेक्षकांना ढसाढसा रडवलं तो चित्रपट जेव्हा रिलीज आधी झाला तेव्हा हिट झाला नव्हता… त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांनी खास शक्कल लढवली होती… त्या काळी माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपट गाजत होते… माहेरची साडी चित्रपटाबाबतही तेच झालं होतं… वेगवेगळ्या शहरांतून लोकं थिएटरमध्ये चित्रपट पाहायला येत होते… आणि याच प्रेक्षकांसाठी निर्मात्यांनी चक्क रुमाल देऊ केले होते. ज्याचा उपयोग प्रेक्षकांना चित्रपटगृहात होतच होता. परिणामी चित्रपटाने बक्कळ कमाई केली… ७५ आठवडे थिएटरमध्ये सुरु असणाऱ्या माहेरची साडी चित्रपटाने इतिहास रचला आहे… मध्यंतरीच्या काळात माहेरची साडी चित्रपटाचा सिक्वेल येणार अशा चर्चा रंगल्या होत्या… मात्र, दुसरा भाग प्रेक्षकांना कितपत आवडेल आणि आजच्या चित्रपटांच्या कथानकाच्या ओघात तो किती जुळेल हे सांगणं जरा अवघडच आहे…(Vijay Kondke movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/marathi-movie-maherchi-sadi-was-first-offer-to-actress-bhagyashree/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई