‘काजळमाया’ या गूढ मालिकेतून अक्षय केळकरची स्टार प्रवाहवर एण्ट्री!
गेल्या पाच वर्षांपासून दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नेहमीच नवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि घरच्यांसारखी वाटणारी पात्रं देणं हे स्टार प्रवाहचं वैशिष्ट्य ठरलं आहे. हाच वारसा पुढे नेत आता वाहिनी प्रेक्षकांसमोर एक वेगळ्या धाटणीची गूढ मालिका घेऊन येत आहे ज्याच नाव आहे ‘काजळमाया‘. ही मालिका एका चेटकीण वंशाची कहाणी सांगते. विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत निपुण असलेली पर्णिका ही या मालिकेची केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा. तिला चिरतरुण्याचं वरदान लाभलेलं आहे. रुपाने मोहक असली तरी तिच्या मनात फक्त स्वार्थ, महत्वाकांक्षा आणि निर्दयता आहे. पर्णिकेचं एकमेव ध्येय म्हणजे स्वतःचं साम्राज्य उभारणं आणि चेटकीण वंशाचा विस्तार करणं. सगळ्यांना आपल्या पायाशी आणण्यासाठी ती कुठल्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहत नाही. पण तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुष कडून आव्हान मिळतं, तेव्हा सुरू होते ‘काजळमाया‘ रहस्यमय आणि रोमांचकारी प्रवासाची कहाणी.(Actor Akshay Kelkar) Bollywood Tadka
या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर मुख्य भूमिका साकारत आहे. तो आरुष वालावलकर या पात्रात दिसणार असून हे पात्र त्याच्यासाठी अगदी वेगळं आहे. आरुष हा कवी मनाचा, साधा-सरळ, कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा आणि चांगुलपणासाठी ओळखला जाणारा तरुण आहे. तो मराठी विषयाचा प्राध्यापक असून कवितावाचनातली त्याची हातोटी विलक्षण आहे. पहिल्यांदाच गूढ मालिकेत असं वेगळं पात्र साकारताना अक्षय केळकरने आपली उत्सुकता व्यक्त केली आहे.
वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, गूढ आणि उत्कंठावर्धक विषय कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. काजळमाया ही आमच्यासाठी एक नवी दिशा आहे. नवे विषय, नवी पात्रं आणि ताकदीचे कलाकार यांच्या जोरावर ही मालिका नक्कीच लोकप्रिय ठरेल, असा विश्वास वाटतो.”(Actor Akshay Kelkar)
==================================
हे देखील वाचा: ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर; अभिनेत्री नेहा जोशी झळकणार ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत !
===================================
कथानकातील गूढता, पर्णिका आणि आरुष यांच्यातील संघर्ष, तसेच रहस्यमय वातावरण यामुळे काजळमाया प्रेक्षकांना एका वेगळ्या अनुभवाची सफर घडवेल. त्यामुळे, नवं काही पाहण्याची उत्सुकता असलेल्या प्रेक्षकांसाठी ही मालिका खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे. लवकरच फक्त स्टार प्रवाहवर ही रहस्यमय सफर सुरू होणार आहे. Latest Marathi Movies
Original content is posted on https://kalakrutimedia.com/akshay-kelkar-makes-a-grand-entry-on-star-pravah-with-the-mysterious-new-show-kajalmaya-info/
Comments
Post a Comment