Ranveer Singh सध्या करतोय तरी काय?
‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) चित्रपटापासून अजून एकही चित्रपट रणवीर सिंगचा आला नाही अशी चर्चा सिनेवर्तृळात ऐकू येत आहे… मात्र, लवकरच रणवीर सिंग (Ranveer Singh) एक नाही तर दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय सादर करताना दिसणार आहे…आजवर, कॉमेडी, विलन अशा विविधांगी भूमिका साकारल्यानंतर रणवीर सिंग प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची एक वेगळी बाजू लवकरच दाखवणार आहे… (Bollywood News) Celebrity interviews
रणवीर सिंग ‘धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटात हटके अंदाजात दिसणार असून सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचं कथानक असणार आहे… विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट देखील आहे. तसेच, या चित्रपटानंतर रणवीर फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे…(Ranveer Singh movies)
फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन २’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं… अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाची Legacy शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने‘डॉन २’मध्ये जपली होती… आता डॉन ३ मध्ये शाहरुख ऐवजी रणवीर सिंग दिसणार असल्यामुळे आधी तर प्रेक्षकांनी नाकं मुरडली होती… मात्र, त्याच्या सच्च्या चाहत्यांनी रणवीरच्या अभिनयावर विश्वास ठेवला असून त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत…
दरम्यान, रणवीर सिंग जय मेहता यांच्या ‘झॉम्बी’ चित्रपटातही दिसणार असून २०२६ मध्ये या चित्रपटाची तयारी सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे… मॅडॉक फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार असून अमित शर्मा दिग्दर्शक असणार आहेत… शिवाय ‘डॉन ३’ आणि ‘धुरंधर’ चित्रपटानंतर एखादा चित्रपट रणवीर आणि दीपिका पादूकोण (Deepika Padukone) यांनी पुन्हा एकदा एकत्र करावा अशी चाहत्यांची इच्छा आहे… लेक दुआ हिच्या जन्मानंतर तसं पाहायला गेलं तर रणवीर-दीपिका चित्रपटांपासून जरा लांब गेले आहेत… आता येत्या काळात त्यांचे एकत्रित चित्रपट येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Entertainment News) Guest Interviews
================================
हे देखील वाचा : Deepika Padukone : दीपिका पादुकोण हिची The Internच्या हिंदी रिमेकमधून एक्झिट
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/ranveer-singh-upcoming-movies-don-3-dhurandhar-and-much-more/
Comments
Post a Comment