Soha Ali Khan आणि सैफ अली खान एकत्र का राहात नव्हते?
आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर (Sharmila Tagore0… त्यांची दोन मुलं सोहा अली खान आणि सैफ अली खान ही म्हणजे बॉलिवूडमधील आनंदी भाऊ-बहिणीची जोडी… सैफ अली खान पुर्णपणे चित्रपटांमध्ये आपलं करिअर करत होता आणि आजही करतोय… पण सोहा अली खान फार चित्रपटांमध्ये दिसली नाही… नुकताच ‘छोरी २’ (Chhori 2) चित्रपट तिने केला तितकाच.. मात्र, तुम्हाला माहित आहे का सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि सैफ अली खान एकत्र एका घरात राहात नव्हते… इतकंच काय तर तिच्या आणि करिनाच्या नात्याबद्दलही मोठा खुलासा समोर आला आहे… चला तर जाणून घेऊयात…(Bollywood news) Bollywood Masala
सोहा अली खान हिने The Quint शी बोलताना भाऊ सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना कपूर खानसोबतच्या नात्यावर प्रकाश टाकला. सोहा म्हणाली की, मी आणि सैफ फार कमी वेळा एकाच घरात होतो, कारण आमच्यात ९ वर्षांचा फरक असल्यामुळे जेव्हा मी जन्माला आले तेव्हा सैफ इंग्लंडमधल्या बोर्डिंग स्कूलला गेला होता…. आणि जेव्हा तो भारतात परत आला तेव्हा मी माझ्या करिअरमध्ये बिझी होते… त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत फार वेळ कधीच घालवला नाही… शिवाय भाऊ-बहिण म्हणून कोणत्याही गोष्टीवर बसून बोललो देखील नाही”…
यानंतर सोहाने करिनाबद्दल (Kareena Kapoor) बोलताना म्हटलं की, ‘माझ्या मते करिना एक अत्यंत खरी व्यक्ती आहे. तिच्यासाठी कुटुंब खूप महत्त्वाचे आहे. ती एक जबाबदार आई, पत्नी, मुलगी आणि बहिण आहे… आधी आम्हाला आमच्यातील नातं तयार करण्यासाठी वेळ लागला खरा पण नंतर सारं काही जुळून आलं”… आजवर सोहा अली खानने आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल कधीच कुठे उघडपणे काही वाच्यता केली नव्हती… मात्र, पहिल्यांदाच ती आपल्या भाऊ आणि वहिनीसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली आहे…(Entertainment News)
================================
=================================
सोहा अली खान हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आजवर ‘इति स्रीकंता’, ‘दिल मांगे मोअर’, ‘शादी नं १’, ‘अंतरमहल’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दिल कब्बडी’, ‘९९’, ‘लाईफ गोज ऑन’, ‘तुम मिले’, ‘मिडनाईट चिल्ड्रन’, ‘वॉर छोड ना यार’, ‘गो गोवा गॉन’ अशा चित्रपटांत ती झळकली होती…(Soha Ali Khan) Entertainment Mix Masala
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/soha-ali-khan-explain-her-relation-with-saif-ali-khan-and-kareena-kapoor/
Comments
Post a Comment