अखेर स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांच्या आवडती मालिका ‘अबोली’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप !

 स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेने ‘अबोली’ने अखेर 26 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेली तब्बल चार वर्षं आणि 1200 हून अधिक एपिसोड्स प्रेक्षकांचे मन जिंकत राहिलेल्या या मालिकेचा गोड शेवट दाखवला गेला. अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी साकारलेली अंकुश-अबोलीची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली आहे.(Aboli Marathi Serial) Bollywood Tadka

‘अबोली’चा पहिला भाग 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसारित झाला होता. या काळात मालिकेने 1267 एपिसोड्स पूर्ण केले. हे मराठी मालिकांच्या इतिहासात एक मोठं यश आहे. वेळोवेळी लोकप्रिय कलाकारांनी खास भूमिकांमधून मालिकेत एन्ट्री घेतली आणि प्रत्येक वळणावर ‘अबोली’ प्रेक्षकांना भावली. रात्री 11 वाजता प्रसारित होणारी ही मालिका प्रेक्षकांसाठी एक सवयच बनली होती. अलीकडेच ‘अबोली’च्या टीमने Wrap-Up पार्टी साजरी केली आणि वाहिनीनेही सचित व गौरीचा एक खास व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोघांनी आपल्या प्रवासाच्या आठवणी सांगताना प्रेक्षकांचे आभार मानले. वाहिनीनेही मालिकेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादासाठी प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आता ‘अबोली’ संपल्यानंतर स्टार प्रवाहवर नवीनमालिका ‘काजळमाया’ 27 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या मालिकेत रुची जाईल, अक्षय केळकर आणि वैष्णवी कल्याणकर ही प्रमुख कलाकार आहेत. हॉरर थ्रिलर असलेली ही कथा दररोज रात्री 10:30 वाजता प्रसारित होईल.नवीन शोमुळे इतर मालिकांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ‘तू ही रे माझा मितवा’ (अभिजीत आमकर आणि शर्वरी जोग) ही मालिका आता रात्री 8 वाजता दाखवली जाईल. तर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ (गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव) ही मालिका आता रात्री 11 वाजता प्रसारित होईल.(Aboli Marathi Serial)

===========================

हे देखील वाचा: मराठी मालिकाविश्वातल्या लोकप्रिय जोडप्याच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण 

============================

‘अबोली’ची कहाणी संपत असली तरी तिच्या आठवणी, भावनिक प्रसंग आणि अंकुश-अबोलीची नात्याची ऊब प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार आहे. आता ‘काजळमाया’ ही नवीन मालिका त्या जागेवर किती जादू करते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल! Bollywood Masala

Original content is posted on https://kalakrutimedia.com/star-pravahs-beloved-show-aboli-ends-after-1200-plus-episodes-fans-get-emotional-as-the-journey-concludes-info/










Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?