“Kantara Chapter 1 मध्ये मी जे पाहिलं ते जादूसारखं…”; रितेश देशमुखची ऋषभ शेट्टीसाठी खास पोस्ट
सध्या ‘कांतारा : चॅप्टर १’ (Kantara : A Legend-Chapter 1) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: भंडावून सोडलं आहे… ऋषभ शेट्टी लिखित-दिग्दर्शित आणि अभिनित ‘कांतारा : अ लेजेंड -चॅप्टर १’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे… कन्नड चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुपरहिट चित्रपट ठरलेल्या ‘कांतारा १’ चं देशभरात कौतुक सुरु आहे… अभिनेता यश, ज्युनिअर एनटीआर, संदीप रेड्डी वांगा अशा बऱ्याच कलाकारांनी कांताराचं कौतुक करत ऋषभचं (Rishabh Shetty) अभिनंदन केलं आहे… आता अभिनेतारितेश देशमुख यानेही ‘कांतारा १’ चं विशेष कौतुक करणारी पोस्ट केली आहे… (Riteish Deshmukh praises Kantara 1 movie) Latest Marathi Movies
‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ चं भरभरुन कौतुक करणारी पोस्ट लिहिताना रितेश देशमुख म्हणाला आहे की, “ ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ पाहिल्यानंतर एक थरारक आणि भव्य भारतीय सिनेमा पाहिल्याचा अनुभव आला. ऋषभ शेट्टी, तुम्ही अभिनेता, लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून ज्या पद्धतीनं काम करता, ते खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं काम भविष्यातील पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देईल. मी या चित्रपटात जे पाहिलं, ते खरंच जादूसारखं वाटलं. उत्तम व्हीएफएक्स, जबरदस्त अॅक्शन, उत्कृष्ट छायाचित्रण, थरारक पार्श्वसंगीत व देखणं सेट डिझाईन – सगळंच सर्वोत्तम…”(Entertainment News)
पुढे रितेशने लिहिलं आहे की, “रुक्मिणी वसंत तुम्ही खूपच प्रतिभावान अभिनेत्री आहात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा! गुलशन देवैया, तुमची नकारात्मक भूमिका इतकी प्रभावी होती की, ती पाहणंही थरारक वाटलं. अशा एका दर्जेदार आणि जबरदस्त सिनेमाबद्दल चित्रपटाच्या टीमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा”… (Kantara 1 news)================================
हे देखील वाचा : Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !
=================================
दरम्यान, ‘कांतारा १’चित्रपटाचं बजेट १२५ कोटी असून आत्तापर्यंत चित्रपटाने बजेटची किंमत बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून पार केली आहे… ६ दिवसांमध्ये या चित्रपटाने २२८.१६ कोटी कमावले असून येत्या काळात २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘कांतारा’ आणि ‘केजीएफ २’ (KGF 2) चा बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड मोडणार कांतारा १ मोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागंल आहे…(Kantara 1 box office collection) Latest Marathi Webseries
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/kantara-chapter-1-riteish-deshmukh-praises-rishab-shettys-acting-states-it-will-motivate/
Comments
Post a Comment