Big Boss Marathi Season 6 लवकरच!;कोण असणार होस्ट आणि कंटेस्टंट?

 कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा आवडता शो आता सहावा सीझन घेऊन लवकरच येणार आहे… नुकतीच कलर्सवर मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनची घोषणा झाली असून त्यांनी पहिला प्रोमो रिलीज केला… आता यंदाच्या सीझनमध्ये कोणते कंटेस्टंट असणार? हटके ट्विस्ट आणि थीम काय असणार आणि महत्वाचं म्हणजे हा शो कोण होस्ट करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Marathi Big Boss Season 6) Entertainment Mix Masala

दरम्यान, मराठी असो किंवा हिंदी छोट्या पडद्यावर जितकी चर्चा डेली सोप्सची असते त्यापेक्षा थोडी जास्त ही बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाची होतेच… आणि प्रेक्षकांची हिच उत्सुकता लक्षात घेता मराठी बिग बॉसचा सहावा सीझन भेटीला येणार आहे…कलर्सने सहाव्या पर्वाची घोषणा करत पहिला प्रोमो शेअर केला असून त्यात अनेक दरवाजे दिसत आहेत.. आणि त्यानंतर स्वर्ग आणि नरक अशा दोन दरवाजांची यात झलक दिसते… त्यामुळे मनोरंनाचं दार आता लवकरच आणि बिग बॉस मराठी लवकरच आपल्या भेटीला येणार.. प्रोमोवरुन यंदाचं सीझनही गाजणार हे किमान प्रोमोवरुन तरी लक्षात आलं आहेच… (Entertainment News)

आता मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनचं होस्ट कोण असणार? ही चर्चा लगेच सुरु झाली आहे… कारण पहिले ४ सीझन द वन अॅण्ड ओन्ली महेश मांजरेकर यांनी केले होते… आणि पाचवा सीझन रितेश देशमुखने होस्ट केला होता पण त्याचं सुत्रसंचलन फारसं प्रेक्षकांना आवडलं नव्हतं, शिवाय विकेंडच्या वारला मांजरेकरांइतका धाक कंटेस्टंटला त्याचा वाटला नाही अशा प्रतिक्रिया देखील लोकांच्या आल्या होत्या… त्यामुळे आता सीझन ६ मध्ये महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) पुन्हा येणार? की रितेश देशमुखचं (Riteish Deshmukh) असणार? किंवा आणखी नवा कोणता होस्ट येणार हे पाहण्यासाठी आता आतुरता वाढली आहे…

दरम्यान, मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनची विनर होती मेघा धाडे, दुसऱ्या सीझनचा विनर होता शिव ठाकरे, तिसऱ्या सीझना विनर होता विशाल निकम, चौथ्या सीझनचा विनर होता अक्षय केळकर आणि पाचव्या सीझनचा विनर होता सुरज चव्हाण… सगळ्या सीझनचे विनर पाहिले तर एक गोष्ट नक्की लक्षात येते की या सगळ्यात एकच Female Contestant विनर होती.. त्यामुळे आता येणाऱ्या सहाव्या सीझनमध्ये मुलगी विनर व्हावी अशी इच्छा नक्कीच आहे… तसेच, सध्या हिंदी बिग बॉसचा १९वा सीझन सुरु असून तो संपल्यावरच मराठी बिग बॉसचा सहावा सीझन सुरु होई असा अंदाज बांधला जात आहे…Entertainment Mix Masala


================================

हे देखील वाचा : Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर सज्ज; पाहा शानदार घराची पहिली झलक !

================================

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/marathi-big-boss-season-6-official-announcement/







Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?