अखेर Isha Keskar चं ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका सोडण्याचं खरं कारण आलं समोर!
Zee Marathi वरील लोकप्रिय ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ( Lakshmichya Pavlani) या मालिकेमध्ये सध्या एक मोठा ट्वीस्ट आला आहे. मालिकेतील मुख्य नायिका कला, जी अभिनेत्री ईशा केसकर (Actress Isha Keskar) हिने साकारली होती, ती अचानक मालिका सोडून गेल्यामुळे तिच्या फॅन्समध्ये नाराजीच वातावरण आहे. परंतु ईशा केसकरने या निर्णयाचं आता स्पष्ट कारण सांगितलं आहे, ज्यामुळे तिचे चाहते तिच्या निर्णयाची कारणं समजू शकतात. ईशाने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यात तिने तिच्या मालिका सोडण्याचा निर्णय स्पष्ट केला. ईशा म्हणते, “सलग दोन वर्षांपासून मी काम करत होते आणि माझ्या डोळ्याला काही काळापूर्वी फोड आला होता. त्यानंतरही मी चित्रीकरण करत राहिले. पण हा अपघात वाढत गेल्याने डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.” ती पुढे अस ही म्हणाली की, “जर मी आता विश्रांती घेतली नाही, तर भविष्यात डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल आणि त्यामुळे मी काही काळ सूर्यप्रकाश देखील पाहू शकणार नाही.”(Actress Isha Keskar) Latest Marathi Movies
ईशाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिने मालिकेपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. “मी सप्टेंबरमध्येच मालिकेची टीमला कळवलं होतं की मी शारीरिक कारणांमुळे सुट्टी घेणार आहे. या वेळी माझ्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता होती, आणि त्यामुळे कथेवरही परिणाम होऊ शकत होता.” आधीच काही वेळा ईशा अस्वास्थ्यामुळे मालिकेतून अनुपस्थित होती. चिकनगुनियामुळे आणि अन्न विषबाधेने ती काही काळ रजेवर गेली होती. “त्यानंतर माझ्या डोळ्याच्या दुखापतीमुळे मी आणखी काही काळ विश्रांती घेणे आवश्यक ठरले,” अस ती म्हणाली.
कामाची गरज जरी महत्त्वाची असली तरी, शरीर ही तितकच महत्त्वाच आहे. “आपण मेहनत करून पैसे कमावतो, परंतु त्या मेहनतीचा आनंद घेत नसेल तर त्यात काही अर्थ नाही. म्हणूनच, मी विश्रांती घेत आहे, आणि पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करण्याआधी स्वतःच्या शारीरिक आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे.”अस ही ईशा म्हणाली. (Actress Isha Keskar)
===============================
हे देखील वाचा: बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात ‘Yed Lagal Premach’ मालिकेतून करण्यात येणार जनजागृती!
===============================
ईशा पुढे सांगते की, “सप्टेंबरपासून मी विश्रांती घेणं सुरू केलं आहे. आता मी व्यायामाला महत्त्व देऊन आणि शारीरिक स्वास्थ्यावर लक्ष देऊन पुन्हा काम सुरू करण्याची तयारी करत आहे.” ईशा केसकरला प्रेक्षकांनी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ (Jai Malhar) आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ (Majhya navryaachi Bayko) या मालिकांमध्ये तिच्या भूमिका खूपच पसंती दिल्या आहेत. तिच्या कामामुळे तिला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली, आणि तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. ईशाची ही नवी पिढीला एक महत्त्वाची शिकवण आहे की, शारीरिक स्वास्थ्य ही आपल्या करियरपेक्षा कमी महत्त्वाची नाही. विश्रांती घेतल्यावरच आपल्याला परत उभं राहता येतं आणि कधीही आपल्या शरीराच्या सिग्नल्सला दुर्लक्ष करू नये. Latest Marathi Movies
Original content is posted on https://kalakrutimedia.com/finally-isha-keskars-real-reason-for-leaving-lakshmichya-pavlani-comes-to-light-info/
Comments
Post a Comment