‘माझा मुलगा 4 वर्षांपासून..’ , खंडणी प्रकरणात सुनेच नाव आल्यानंतर अभिनेत्री Archana Patkar ने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा !

 मुंबईत एका नामांकित बिल्डरकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून त्यापैकी एक महिला मराठी मनोरंजनसृष्टीशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. अटक करण्यात आलेली हेमलता पाटकर ही अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे ती लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मधील कांचन देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. हेमलता पाटकर (Hemlata Patkar) आणि अमरिना झवेरी या दोघींनी मिळून गोरेगावमधील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनयभंगाच्या खोट्या आरोपात अडकवण्याचा इशारा देत दोघींनी तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. या खंडणीपैकी पहिला हप्ता म्हणून दीड कोटी रुपये स्वीकारताना मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोघींनाही रंगेहाथ पकडलं.(Actress Archana Patkar) Bollywood Tadka


ही बातमी बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी स्वतः प्रतिक्रिया देत परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं की, त्यांचा मुलगा आणि हेमलता पाटकर यांचा गेल्या चार वर्षांपासून कोणताही संबंध नाही. दोघेही बराच काळ वेगळे राहत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे मराठी मनोरंजनविश्वात आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अर्चना पाटकर यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे,
‘मायबाप प्रेक्षकांना तसंच मीडियाला नमस्कार, मी गेली 40 वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा 4 वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला आहे. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे. म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका’, असं अर्चना यांनी म्हटलं आहे.(Actress Archana Patkar)

======================================

हे देखील वाचा: Lagnacha Shot Movie: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरे अभिजीत-प्रियदर्शिनी आता मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार!

======================================

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही तक्रार मागे घेण्यासाठी महिलांनी बिल्डरकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. सुरुवातीला तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पुढे दोन्ही बाजूंमध्ये चर्चा आणि तडजोडीनंतर ही रक्कम 5.5 कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, यामुळे शहरात आणि मनोरंजनसृष्टीत मोठी चर्चा रंगली आहे. Bollywood Masala

Original content is posted on https://kalakrutimedia.com/my-son-has-been-separated-for-4-years-actress-archana-patkar-breaks-silence-after-daughter-in-laws-name-surfaces-in-extortion-case-info/






Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !