“३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे!”; Prasad Oakची मोठी घोषणा!
अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) चित्रपट, मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला… शिवाय, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो आपल्या भेटीला रोज येतोच… याच कार्यक्रमातील कलाकार कायमच त्याला प्रसाद ओक पार्टी कधी देणार? असा प्रश्न विचारत असतात… बऱ्याचदा कलाकारांनी आपल्या स्किट्समध्ये प्रसादला हा प्रश्न विचारुन लोकांना खळखळून हसवलं आहे… आता मात्र, स्वत:च प्रसाद ओकने तो लवकरच पार्टी देणार असल्याचं जाहिर केलं आहे… नेमकं काय म्हणाला आहे तो? (Maharashtrachi Hasyajatra)
तर, प्रसाद ओकने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे… यात त्याने पार्टी देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याने त्याचा बॅकग्राऊंड असलेला एक रिल शेअर केला आहे. यात प्रसाद म्हणतो, ”३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे. पत्ता पुढीलप्रमाणे…”. पुढे व्हिडीओत एक न्यूज अँकर दिसतो. तो काय बोलतो हे अजिबात कळत नाही. शेवटी ”नक्की या, वाट बघतोय” असं म्हणत प्रसाद हसण्याचे इमोजी शेअर करतो. प्रसादचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Prasad Oak Social Media Post) Celebrity Interviews
दरम्यान, प्रसादच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ”साहेब आलो असतो पण एकादशी आहे”,” ३१ डिसेंबर आहे की १ एप्रिल”, ”मला कळलं आहे… खारघरला आहे, ”उपवासाची खिचडी आणि फराळी मिसळ मेनू असेल”, ”सर तुमचं घर माहित आहे मला, मी येतो तिकडे, तिथून पुढे सोबत जाऊ आपण”, अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत…
================================
हे देखील वाचा : पाकिस्तानात शूट झाला आहे का Ranveer Singh याचा ‘धुरंधर’?
================================
दरम्यान, प्रसादने सिनेसृष्टीतल्या त्याच्या करिअरला सुरुवात देखील नाटकापासूनच केली. प्रसादने श्रीराम लागू (Shriram Lagoo) यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) नाटकात श्रीराम लागू यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नाटकांमध्ये काम करताना प्रसादने पुणे सोडून मुंबई गाठले. मुंबईमध्ये आल्यानंतर प्रसादचा मोठा संघर्ष सुरु झाला. इथे त्याचा राहण्यासाठी जागा शोधण्यापासूनच संघर्ष सुरु झाला. मात्र मेहनत आणि अथक प्रयत्न करून प्रसाद प्रत्येक अडचणींवर मात करत पुढे जात राहिला. अशातच त्याला ‘बंदिनी‘ (Bandini) या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक संधीचं प्रसादने सोनं केलं… (Marathi Entertainment News) Guest interviews
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/prasad-oak-share-funny-video-on-his-instargam/
Comments
Post a Comment