Suneil Shetty : सुशांत सिंह राजपूतनंतर कार्तिक आर्यनचं करिअर संपवण्याचा प्रयत्न?

null

 बॉलिवूडमधला हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याचं २०२० मध्ये निधन झालं… त्याच्या मृत्यूमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने सुपर टॅलेंटेड असणारा कलाकार आपण गमावला… बॉलिवूडमध्ये येताना कुठल्याही गॉडफादरचा हात डोक्यावर नसताना सुशांतने छोटा पडदा ते मोठा पडदा असा प्रवास त्याने पुर्ण केला… एकीकडे अभिनेता म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या सुशांतचा मृत्यू आत्महत्या होती की खून हे कोडं अद्याप उलगडलं नसलं तरी लोकांच्या मनात सुशांतने त्याची जागा कायम केली आहे… सुशांतच्या मृत्यूनंतर असं म्हटलं गेलं की त्याचे पाय इंडस्ट्रीतील लोकांनी खेचायचा प्रयत्न केला… आता याचीच पुर्नरावृत्ती अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यासोबत होत असल्याचं म्हटलं जात आहे…. आता या प्रकरणात सुनील शेट्टीचं नाव का जोडलं जात आहे जाणून घेऊयात…  (Bollywood News) Entertainment mix masala

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यावर सुनील शेट्टी याने आपलं मत व्यक्त केलं आहे… तर झालं असं की, नुकताच कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ (Tu Meri Mein Tera Mein Tera Tu Meri) चित्रपट रिलीज झाला… बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी न करु शकल्यामुळे सोशल मीडियावरही कार्तिकविरुद्ध नकारात्मकतेची लाट पाहायला मिळाली. अशातच सोशल मीडियावर एक रील व्हायरल झालं असून यात कार्तिक विरोधात मुद्दाम नकारात्मक अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे, (Suneil Sheety News)

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने कार्तिक आर्यनविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या ‘नेगेटिव्ह पीआर’वर एक व्हिडीओ बनवला अशून त्याने म्हटलं आहे की, “जर कोणाला चित्रपट आवडला नाही, तर त्यावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण एखाद्या कलाकाराला सतत ‘फेक पीआर प्रॉडक्ट’ म्हणून दाखवणे चुकीचे आहे. मला विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे की, अनेक निर्माते आणि प्रसिद्ध यूट्यूबर्सना पैसे देऊन एखाद्या कलाकाराची प्रतिमा मलिन करणारे व्हिडीओ बनवण्यास सांगितले जाते”. (Entertainment News)

दरम्यान, इन्फ्लुएन्सरने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा प्रश्न चित्रपट आवडतो की नाही याचा नाही. टीका कुठे थांबते आणि क्रूरता कुठे सुरू होते, हा खरा मुद्दा आहे. तुम्ही कथेवर, गाण्यांवर किंवा पटकथेवर टीका करा, पण एखाद्या बाहेरील व्यक्तीचे करिअर संपवण्यासाठी वैयक्तिक द्वेष पसरवणे भयंकर आहे. पैसा देऊन आवाज दाबणे किंवा पात्राची बदनामी करणे सिनेमॅटिक प्रामाणिकपणाला साजेसं नाही”. आणि या व्हिडिओला सुनील शेट्टी याने लाईक केलं आहे… त्यामुळे सुनील इन्फ्लुएन्सरच्या मताशी सहमत असल्याची जोरदार चर्चा सिनेइंस्ट्रीत सुरु झाली आहे…

या पूर्वी देखील मुलाखतींमध्ये सुनील शेट्टीने सुशात सिंग राजपूतच्या मृत्यूबद्दल भाष्य केलं होतं.. तो म्हणाला होता की इंडस्ट्रीत कलाकारांना स्ट्रेस असतोच पण त्यामुळे कुणी इतकं सहजासहजी आयुष्य संपवत नाही… तसेच, सुशांतने फार कमी कालावधीत आपलं अस्तित्व बॉलिवूड इंडस्ट्रीत निर्माण केलं होतं… मी देखील बऱ्याचदा स्ट्रेसमधून गेलो आहे… पण त्यातून बाहेरही पडलो आहे..”, असं म्हणत सुनीलने आफलं मत व्यक्त केलं होतं… (Suneil Shetty & Sushant Singh Rajput)

================================

हे देखील वाचा : Sushant Singh Rajput बॅकग्राऊंड डान्सर ते प्रतिभासंपन्न अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा छोटा मात्र उल्लेखनीय प्रवास

================================

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan Movies) याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कार्तिकने २०११ मध्ये रिलीज झालेल्या प्यार का पंचनामा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं… पुढे ‘आकाशवाणी’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘गेस्ट इन लंडन’, ‘लुका छुप्पी’, ‘पती, पत्नी और वो’, ‘लव्ह आज कल’, ‘फ्रेडी’, ‘भूल भूलैय्या २’, ‘शेहजादा’, ‘चंदू चॅम्पियन’ अशा अनेक चित्रपटांत त्याने कामं केली आहेत…Bollywood masala

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/bollywood-suniel-shetty-hints-that-what-happened-to-sushant-singh-rajput-is-going-to-happen-to-kartik-aaryan/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !