Case No.73 Movie: ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे; सहस्यमय सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !
मानवी चेहरा हा अनेकदा एक मुखवटा असतो. त्या मुखवट्यामागे दडलेले असतात न सांगितलेले सुख-दुःख, न उमजलेल्या भावना आणि अनेक गूढ रहस्य. बाहेरून साधा वाटणारा माणूस आतून किती वेगळा असू शकतो, हे आपल्याला कळतही नाही. आणि जेव्हा अचानक तो मुखवटा बाजूला सरकतो, तेव्हा समोर येणारे सत्य आपल्यालाच थक्क करून सोडते. अशाच धक्कादायक वास्तवाचा वेध घेणारी कथा म्हणजे ‘केस नं. ७३’. ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे अशा पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा रहस्यमय चित्रपट प्रेक्षकांच्या मनात सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न निर्माण करतो. नुकतेच प्रदर्शित झालेले मोशन पोस्टर या कथेतील गूढ अधिक गडद करत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवत आहे.(Case No.73 Motion Poster) Bollywood Tadka लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून, त्यांनीच शर्वरी सतीश वटक यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते म्हणून प्रविण अरुण खंगार यांच...