‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!
शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे.
महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि नियोजनावर विजय अवलंबून असतो.
‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. आता हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ ऐवजी ६ फेब्रुवारी २०२६ ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.दरम्यान, या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका आहेत.
Original blogs was published on Kalakruti Media.
https://kalakrutimedia.com/ranpati-shivray-swari-agra-marathi-movie-new-release-date/
Comments
Post a Comment