Rubaab Marathi Movie: मराठमोळा दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे घेऊन येतोय गावाकडची ‘रुबाब’दार लव्ह स्टोरी !

 मराठी चित्रपटसृष्टी सतत बदलत असून नव्या विचारांची, वेगळ्या आशयाची आणि दमदार दृष्टीकोन असलेल्या दिग्दर्शकांची नवी पिढी पुढे येत आहे. या नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या यादीत आता शेखर बापू रणखांबे (Shekhar Bapu Rankhambe) यांचं नाव ठळकपणे समोर येत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ (Rubaab) या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सोशल मीडियावर ‘रुबाब’ची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेमकथेचा पाया असलेला हा चित्रपट केवळ रोमँटिक चौकटीत अडकलेला नसून, त्यामागे असलेला स्वाभिमान, आत्मविश्वास आणि ठाम भूमिका यांचं प्रभावी चित्रण करतो.(Rubaab Marathi Movie) Bollywood tadka

शेखर बापू रणखांबे यांचा प्रवास संघर्षातून घडलेला आहे. मुंबईत करिअरच्या शोधात असताना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या कामांतून आपली वाट शोधली. सुरुवातीला त्यांनी प्लंबिंगसारखी कामं केली, त्यानंतर रंगभूमीशी त्यांचा संबंध आला. नाटकांच्या पडद्यामागे काम करताना त्यांनी अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनातील बारकावे जवळून आत्मसात केले.या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुढे चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं. अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत अनुभव साठवला. त्याचबरोबर त्यांनी ‘रेखा’ आणि ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्म्सचं लेखन-दिग्दर्शन केलं. ‘पॅम्पलेट’ या लघुपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात झाली होती, तसेच केरळ इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री अँड शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या फिल्मला पुरस्कार मिळाला. ‘रेखा’ या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं असून, प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी तिची निर्मिती केली होती.

===============================

हे देखील वाचा: ‘माझा मुलगा 4 वर्षांपासून..’ , खंडणी प्रकरणात सुनेच नाव आल्यानंतर अभिनेत्री Archana Patkar ने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा !

===============================

चित्रपट करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शेखर रणखांबे यांचं हे स्वप्न आता ‘रुबाब’च्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत आहे. गावाकडच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही प्रेमकहाणी असली, तरी तिची मांडणी वेगळी आणि विचारप्रवर्तक आहे. प्रेमासोबतच स्वतःचा आत्मसन्मान जपणं, ठामपणे उभं राहणं आणि आयुष्याकडे पाहण्याचा आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोन हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे सांगतात की, ‘रुबाब’ हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे, कारण हा माझा पहिला सिनेमा आहे. झी स्टुडिओज आणि निर्माते संजय झणकर यांनी दिलेल्या विश्वासामुळे मला योग्य संधी आणि व्यासपीठ मिळालं. कलाकारांनीही प्रामाणिक मेहनत घेतली असून त्यांनी कथेला योग्य न्याय दिला आहे. हा चित्रपट केवळ प्रेमकथा नाही, तर त्यात एक वेगळी ऊर्जा आणि विचार आहे. टीझरला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद होतो आणि प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे.’(Rubaab Marathi Movie)

========================================

हे देखील वाचा: Mi Savitribai Jotirao Phule मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न!

=========================================

या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘रुबाब’चं लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केलं असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्त्यांची जबाबदारी सांभाळत आहेत.प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेला ‘रुबाब’ हा चित्रपट ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेगळा आशय, नवा दिग्दर्शक आणि ठसठशीत मांडणी यामुळे ‘रुबाब’कडून अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. Bollywood Masala

Original content is posted on https://kalakrutimedia.com/rubaab-marathi-movie-director-shekhar-bapu-rankhambhe-brings-a-powerful-rural-love-story-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !