शाहरुख खानमुळे ‘मुन्नाभाई ३’ अडकला? Arshad Warsi याने केला मोठा खुलासा

 

  • बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांतील जोड्या आजही प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत… जय-वीरु, मुन्नभाई सर्किट आणि अशा बऱ्याच… २००३ मध्ये आलेला ‘मुन्नाभाई MBBS’ (Munnabhai MBBS) चित्रपट म्हणजे राजकुमार हिरानी यांचा दिग्दर्शकिय पदार्पणातील पहिलाच चित्रपट… विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटात त्यांनी सिक्सर मारला आणि बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपटांचा एक वेगळा संच प्रेक्षकांच्या भेटीला आणला… या चित्रपटातीलसंजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांची जोडी खुपच गाजली… आजही त्यांचे बरेच मीम्स सोशल मिडियावर व्हायरल झालेले दिसतात… संजय दत्त तर स्टार होताच, पण ‘मुन्नाभाई MBBS’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ने अर्शद वारसीलाही घराघरात पोहोचवलं. परंतु, तुम्हाला माहित आहे का? या चित्रपटाचा तिसरा भाग येणार होता पण तो चक्क शाहरुख खान याच्यामुळे अडकला आहे… नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात…Bollywood Tadka

  • तर, मुन्नाभाई सीरीजचा तिसरा भाग खरं तर येणार होता.. विशेष म्हणजे ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ चित्रपटाचा टीझरही आला होता पण ‘मुन्नाभाई ३ (Munnabhai 3) काही भेटीला आला नाही… याबद्दल अर्शद वारसीने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत महत्वाची अपडेट दिली… अर्शदच्या म्हणण्यानुसार, हा प्रोजेक्ट थांबण्यामागे ‘किंग’ शाहरुख खान (Shah Rukh Khan) होता. ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ची कथा शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’शी खूपशी मिळती होती. त्या चित्रपटातही मुन्ना आणि सर्किट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी जात असतात. राजकुमार हिराणींना त्यांच्या चित्रपटात दुसऱ्या कुणाच्या चित्रपटासारखी समांतरता आवडत नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रोजेक्ट थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं अर्शदने स्पष्ट केले.

  • अर्शद म्हणाला की, “हिराणी इतके शिस्तप्रिय आहेत की जेव्हा त्यांना ‘ओह माय गॉड’बाबत कळले, तेव्हा त्यांनी ‘पीके’च्या सेकंड हाफला तीन वेळा पुन्हा लिहिले.” सध्या हिराणींकडे ‘मुन्नाभाई ३’साठी तीन वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स तयार आहेत, ज्या इतर अनेक चित्रपटांपेक्षा उत्तम आहेत, पण ते अद्याप परिपूर्णतेच्या शोधात आहेत. त्यामुळे येत्या काळात जर का हिरानींना त्यांच्या मनासारखी स्क्रिप्ट मिळाली तर नक्कीच पुन्हा सर्किट आणि मुन्नाभाई आपल्या भेटीला येतील… (Bollywood Movies)

  • दरम्यान, या मुलाखतीवेळी अर्शदने एक मजेशीर किस्साही शेअर केला. तो म्हणाला की, “सुरुवातीला मला ‘मुन्नाभाई MBBS’मध्ये काम करायची इच्छा नव्हती. पण एका टॅरो कार्ड रीडरच्या सल्ल्यानुसार, मी विधू विनोद चोप्रांची भेट घेतली आणि तिथेच राजकुमार हिराणींची भेट झाली. सुरुवातीला माझ्या कॅरेक्टरचं नाव ‘खुजली’ होते, पण मी ते बदलून ‘सर्किट’ केलं. मी सेटवर डायलॉग्जमध्ये अनेक सुधारणा केल्या, पण हिराणींनी कधीही विरोध केला नाही”.

  • बरं, या आधीही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मोठे-मोठे प्रोजक्ट्स रखडले आहेत… आता थेट शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’मुळे मुन्नाभाई आणि सर्किटची अमेरिकेची वारी रेंगाळली हे समोर आलं आहे. आता हा गुंता सुटेल का? मुन्नाभाई ३ येईल का? या प्रतिक्षेत सगळे प्रेक्षक आहेत…Bollywood Masala
    Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi


Original content is posted on https://kalakrutimedia.com/arshad-warsi-says-munnahai-3-was-delayed-because-of-shah-rukh-khan/











Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !