Case No.73 Movie: ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे; सहस्यमय सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !
मानवी चेहरा हा अनेकदा एक मुखवटा असतो. त्या मुखवट्यामागे दडलेले असतात न सांगितलेले सुख-दुःख, न उमजलेल्या भावना आणि अनेक गूढ रहस्य. बाहेरून साधा वाटणारा माणूस आतून किती वेगळा असू शकतो, हे आपल्याला कळतही नाही. आणि जेव्हा अचानक तो मुखवटा बाजूला सरकतो, तेव्हा समोर येणारे सत्य आपल्यालाच थक्क करून सोडते. अशाच धक्कादायक वास्तवाचा वेध घेणारी कथा म्हणजे ‘केस नं. ७३’. ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे अशा पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा रहस्यमय चित्रपट प्रेक्षकांच्या मनात सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न निर्माण करतो. नुकतेच प्रदर्शित झालेले मोशन पोस्टर या कथेतील गूढ अधिक गडद करत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवत आहे.(Case No.73 Motion Poster) Bollywood Tadka
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून, त्यांनीच शर्वरी सतीश वटक यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते म्हणून प्रविण अरुण खंगार यांचा सहभाग आहे. चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटातील प्रत्येक प्रसंग कथेतील नवे रहस्य उलगडतो, पण त्याच वेळी अधिक खोल प्रश्न निर्माण करतो. हा केवळ थरारक किंवा रहस्यमय सिनेमा नसून प्रेक्षकांच्या विचारांना चालना देणारी कथा आहे, असे मत दिग्दर्शक डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेतून स्वतःचे वेगळे सत्य शोधेल, असा त्यांचा विश्वास आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्यपटांचा दर्जा अधिक उंचावण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असल्याचेही निर्मात्यांनी सांगितले आहे. (Case No.73 Motion Poster)
==========================
==========================
या चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांनी लिहिली असून, गीतलेखन मंदार चोळकर यांचे आहे. रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली ‘केस नं. ७३’ अखेर कोणाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढणार आणि त्या मुखवट्यामागे दडलेले सत्य काय असेल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. Bollywood Masala
Original content is posted on https://kalakrutimedia.com/case-no-73-movie-no-face-no-motive-four-murders-and-zero-evidence-motion-poster-of-the-mysterious-marathi-thriller-released-info/
Comments
Post a Comment