सुभाष घई नायक, सहनायक
शीर्षक हे लेखाची ओळख स्पष्ट करते याची तुम्हा जाणकार रसिक प्रेक्षकांना कल्पना आहेच. अशा वेळी “ सुभाष घई नायक, सहनायक ” असे वाचून दचकलात ना? शीर्षक साफ चुकलयं अशीच एव्हाना तुमची प्रतिक्रिया असेल. सुभाष घई ‘शोमन’ निर्माता आणि दिग्दर्शक असे हवे असे तुम्ही म्हणाल. पटकथेची उत्तम जाण असलेला, रुपेरी पडद्यावर गीत संगीत व नृत्याचे बेहतरीन सादरीकरण करणारा सुभाष घई (Subhash Ghai) असे तुम्ही अधिक तपशीलात जात म्हणाल. पण कदाचित तुम्हाला कल्पना नसेल दिग्दर्शक होण्यापूर्वी सुभाष घई हिंदी चित्रपटात अभिनय करायचा, मग पटकथा लेखक झाला, पण एकदम “पिक्चरचा हीरो?” कसे शक्य आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात घोळत असतीलच. Bollywood masala . पुणे शहरातील चित्रपट व दूरदर्शन अभिनय संस्थेतून (एफटीआयआय) अभिनय प्रशिक्षण घेतल्यावर सुभाष घईनी अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणे स्वाभाविक होतेच. त्याने फिल्मफेअर आणि युनायटेड प्रोड्युसर यांच्या टॅलेंट हंट स्पर्धेत भाग घेतला, त्यात राजेश खन्ना, धीरजकुमार, सुभाष घई हे सर्वोत्तम तिघे निवडून आले. या निवडीने सुभाष घई (Subhash Ghai)ला काही चित्रपट मिळाले देखिल. र