‘पाऊस’ वेबसीरिज एका निर्णायक वळणावर; सायली आणि विशालच्या नात्यात नवा ट्विस्ट

 



‘इट्स मज्जा’या युट्यूब वाहिनीवरून प्रसारीत होणाऱ्या “पाऊस” या वेबसिरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  या नवीन सीरिजमधून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांसमोर एक नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पाऊस’ आणि प्रेमाचं नात हे प्रत्येकाला भावणारं असते. प्रत्येकाच्या प्रेम कहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी ‘पाऊस’ हा महत्वाचा असतो. या वेबसिरीजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालचे प्रेमबंध प्रेक्षकांना आवडू लागले आहेत. मुख्य नायक आणि नायिकेच्या भूमिका आरती बिराजदार आणि अक्षय खैरे यांनी साकारल्या आहेत.(Paus Marathi Web series Bollywood masala

Paus Marathi Web series

सायली आणि विशालच्या नात्यात एक नवा ट्विस्ट आला आहे.  तो ट्विस्ट आहे सायलीचा आतेभाऊ. या नव्या ट्विस्टमुळे सायली आणि विशालच्या नात्याचे बंध किती घट्ट होतील, तसेच त्यांचे नाते कोणत्या निर्णायक वळणार पोहोचेल वेब सिरीजचे आगामी भाग सांगतील.‘सुंदरी’ मालिकेतील कर्तबगार व कर्तव्यनिष्ठ कलेक्टरची भूमिका साकारल्यानंतर आरती आता ‘पाऊस’च्या निमित्ताने ग्रामीण भागातील एका गावातल्या साध्या मुलीची भूमिका साकारत आहे. या सीरिजमध्ये आरतीला अभिनेता अक्षय खैरेची साथ मिळाली आहे.

Paus Marathi Web series

अक्षय खैरेसुद्धा आजवर अनेक मालिकांमधून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पाऊस’ ही सीरिज आरती व अक्षय या मुख्य दोन भूमिकांबद्दल असली तरी या सीरिजमध्ये इतर अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. या सीरिजमध्ये ‘देवमाणूस’ या गाजलेल्या मालिकेतल्या सरू आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार यासुद्धा पाहायला मिळणार आहेत.  त्यामुळे ‘पाऊस’ या सीरिजसाठी व या सीरिजमधील कलाकारांच्या आगामी भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.(Paus Marathi Web series)

===========================

हे देखील वाचा: ‘गुलाबी’ शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास; ‘गुलाबी’चा धमाल टिझर प्रदर्शित

===========================

‘पाऊस’ची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांचे असून या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांची आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत.  प्रेम, पाऊस आणि सायली-विशालच्या नात्यातील गोडवा तसेच  दुरावा ‘पाऊस या सीरिजमधून अनुभवा  दर सोमवार व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर. bollywood tadka. 

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/pasu-web-series-takes-a-turning-point-sayali-and-vishals-relationship-takes-a-new-twist-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते